The rains continue unabated at the wedding
The rains continue unabated at the wedding 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाची संततधार सुरू

टीम अॅग्रोवन

अकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस संततधार होत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता. १४) पावसाचा जोर वाढला होता. जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. सततच्या पावसामुळे काटेपूर्णा, खडकपूर्णा प्रकल्पातील साठा वाढत असल्याने या दोन्ही प्रकल्पांच्या काही गेटमधून पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे.

या भागात दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. पावसाचा जोर काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात आहे. शुक्रवारी सकाळ पर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार सर्वच तालुक्यात पाऊस होत आहे. यात अकोट तालुक्यात १०.९, तेल्हारा १३.२, बाळापूर ९.८, पातूर १५.९, अकोला १२.५, बार्शीटाकळी ६, मूर्तिजापूर १२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. वाशीम जिल्ह्यात वाशीम ८.३, रिसोड ३.६, मालेगाव ८.८, मंगरुळपीर १०.३, मानोरा ८.६, कारंजा १३ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे सध्या शेतीतील संपूर्ण कामे ठप्प झालेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस होत आहे.

काटेपूर्णा, खडकपूर्णातून विसर्ग अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ८९.४ टक्के भरलेला असल्याने या प्रकल्पाचे दोन गेट उघडण्यात आले. या प्रकल्पाची ३.४ टीएमसी एवढी क्षमता असून सध्या त्यात २.७४ टीएमसी साठा तयार झालेला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक लक्षात घेता दोन गेट ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प खडकपूर्णाचे सात गेट ३० सेंटिमीटर उघडण्यात आले आहेत. यातून २३४ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग केल्या जात आहे. खडकपूर्णात सध्या २.५३ टीएमसी पाणीसाठा आहे. या भागातील पेनटाकळी प्रकल्पात १.५७ टीएमसी साठा आहे. ७१.१४ टक्के हा प्रकल्प भरला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT