सायखेडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
सायखेडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस 
मुख्य बातम्या

सायखेडा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

टीम अॅग्रोवन

सायखेडा, जि. नाशिक : अनेक दिवसांपासून चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (ता. १)अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला; मात्र वादळामुळे अनेक शेकऱ्यांच्या द्राक्षबागा उखडल्या. सायखेडा येथील कांदा शेड उडून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

तीन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी सायखेडा परिसरात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात काहीसे समाधान पसरले आहे. संध्याकाळी सहा वाजेनंतर सायखेडा परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.  सायखेडा परिसरातील शिंगवे करंजगाव सोनगाव चाटोरी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे सोनगाव-करंजगाव रस्त्यावर शिंगवे (ता. निफाड) शिवारात असणाऱ्या सायखेडा येथील कांदा व्यापारी महेश भुतडा यांच्या शेडचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. शेडमधील २ हजार क्विटंल कांदा भिजला. त्यामुळे त्यांचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. शिंगवे येथील सुभाष कोरडे यांची द्राक्ष बाग उखडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चांदवड तालुक्यात गारपीट सोमवारी (ता.१) आणि मंगळवारी (ता.२) चांदवड तालुक्यात देवरगाव परिसरात वादळी वारा आणि त्यानंतर गारांचा पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांसह, टोमॅटो व फुलशेतीचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.

परतीच्या पावसाने चांदवड भागातील काही गावांना झोडपले. यामध्ये देवरगाव, भोयेगाव या गावांच्या परिसरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास गारपीट झाली. या परिसरात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. पालवी फुटण्याच्या स्टेजला असलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. तसेच, या भागामध्ये टोमॅटो आणि झेंडूच्या फुलांची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याचेही नुकसान झाले. झेंडूची झाडे आडवी पडली आहेत. टोमॅटो पिकाचेही अतोनात नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT