खानदेशात वादळासह पावसाचा तडाखा
खानदेशात वादळासह पावसाचा तडाखा 
मुख्य बातम्या

खानदेशात वादळासह पावसाचा तडाखा

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात रविवारी (ता. १४) मध्यरात्री झालेल्या वादळी पावसात बाजरी, केळी, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले. उघड्यावर वाळविण्यासह साठविलेल्या धान्याची नासाडी झाली. काही ठिकाणी किरकोळ गारपीट झाल्याचीदेखील माहिती मिळाली. 

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्‍यातील चिमठाणे, दोंडाईचा, बेटावद, साक्रीमधील निजामपूर परिसरात वादळासह विजांचा कडकडाट झाला. त्यांनतर पावसाचा हलका शिडकावा झाला. सुसाट वारा सुमारे तासभर सुरू होता. या भागातील बाजरी, आंबा पिकांना त्याचा फटका बसला. 

कुसुंबा (ता. धुळे) येथे सुमारे ३५ ते ४५ मिनिटे मध्यम, हलका पाऊस झाला. याचा फटका बाजरी, कांदा या पिकांना बसला. शिरपूर तालुक्‍यातील सांगवी ते बोराडी या दरम्यानच्या भागातही सुसाट वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या भागातही बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले.  धुळे तालुक्‍यातील गोताणे, उडाणे, चौगाव भागातही जोरदार वाऱ्यांमुळे बाजरी, कांदा या पिकांना फटका बसला. आंब्याचेही किरकोळ स्वरूपातील नुकसान झाले. अनेक भागांत पहाटेपर्यंट वीजपुरवठा बंद होता. कृषी विभागासह महसूल यंत्रणेकडे नुकसान व पिकांची स्थिती यासंदर्भातील नेमकी माहिती सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंत उपलब्ध नव्हती. 

जळगावात केळी भुईसपाट 

जळगाव तालुक्‍यातील भोकर, आव्हाणे, कानळदा भागातील नवती केळी बागांमध्ये पाने फाटून अनेक ठिकाणी वजनदार घडांची झाडे भुईसपाट झाली. पाने फाटल्याने पिकांच्या वाढीवर पुढे परिणाम होईल. बाजरीचे पीक अनेक ठिकाणी मळणीवर आले होते. परंतु सुसाट वाऱ्यामुळे पीक जमिनीवर लोळले आहे. वावडे (ता. अमळनेर) भागात रात्री एक ते दीड मिनिटे गारपीट झाली. चोपडा तालुक्‍यातील गणपूर, लासूर, मालपूर, वढोदा, विटनेर, वाळकी, अजंतीसीम आदी भागातही सुसाट वाऱ्यांचा फटका बाजरी, केळी आदी पिकांना बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT