पाऊस
पाऊस 
मुख्य बातम्या

देशात सरासरीच्या तुलनेत पाच टक्के कमी पाऊस

sandeep navale

पुणे ः गेल्या सव्वातीन महिन्यांत देशातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे; मात्र काही भागांत अजूनही पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे.

देशात एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७५५.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा याच कालावधीत ७२०.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत पाच टक्‍क्‍यांनी कमी आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला. ईशान्य भारतात १२०५.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या भागात झालेला पाऊस हा सरासरीएवढा आहे. हा पाऊस पिकांना चांगला असला, तरी अनेक भागांत नुकसान झाल्याचेही चित्र पाहावयास मिळाले.

वायव्य भारतात सरासरी ५३३.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ५१०.० मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस चार टक्के कमी आहे.

यंदा मध्य भारतात पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्यामुळे अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. महाराष्ट्रातही पावसाचा मोठा खंड  पडल्याने पिके वाया गेली आहेत. दरवर्षी मध्य भारतात सरासरी ८४४.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा सात सप्टेंबरपर्यंत ७७६.१ मिलिमीटर  म्हणजेच आठ टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण द्वीपकल्प भागातही यंदा कमी पावसाचे चित्र आहे.

ईशान्य भारतात जोरदार; मध्य भारतात कमी गेल्या आठवड्यातही ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडला. त्यापाठोपाठ दक्षिण द्वीपकल्पच्या भागातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. मध्य भारतात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्र व केरळच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता. १३) तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा आणि लक्षद्वीपच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल; परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी होऊन हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT