पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी

टीम अॅग्रोवन

पुणे ः चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. बुधवारी (ता. २६) सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली तालुक्यांत धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. विसापूर, कळमोडी धरण क्षेत्रातही पावसाच्या जोरदार सरी कोसळ्याने भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. 

गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत हवामान ढगाळ होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दुपारनंतर पुणे शहरासह परिसरात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुधवारी (ता. २६) दिवसभर हवामान ढगाळ होते. यामुळे तर पुणे शहरासह मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे भात रोपवाटिकाना दिलासा मिळत असून रोपेही वाढीच्या अवस्थेत आहेत.

गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत विसापूर धरणाच्या पाललोट क्षेत्रात सर्वाधिक ४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. तर कळमोडी धरणाच्या क्षेत्रातही ४२ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला ३६, आंध्रा ३०, डिंभे १९, गुंजवणी १६, पानशेत ९, कासारसाई ८, घोड, वरसगाव ७, येडगाव ५, टेमघर, निरा देवधर, भाटघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस पडला. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिल्यास धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होऊन पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल. 

दररोज होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही चांगलाच दिलासा मिळत असून शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेची कामे वेगाने हाती घेतली आहेत. उत्तरकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर पूर्व पट्ट्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, पुरंदर, बारामती या तालुक्यात काही अंशी हवामान ढगाळ होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT