पावसामुळे चासकमान धरणातील साठ्यात वाढ झाली आहे
पावसामुळे चासकमान धरणातील साठ्यात वाढ झाली आहे 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. २) पावसाने उघडीप दिली आहे. बुधवारी (ता.३) सकाळपासूनच ढगाळ हवामानासह मुख्यत: कोरडे हवामान होते. अधूनमधून येणाऱ्या सरींसह ऊनही पडल्याचे चित्र होते. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून, हलक्या सरी येत होत्या. 

जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर ओसरला आहे. पश्चिम भागात हलक्या सरी पडत असून, पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. बुधवारी (ता. ३) जिल्ह्यातील मुठे येथे २३, कार्ला येथे ३०, लोणावळा येथे ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. या भागात मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. बाजरी, मका, तूर, मूग, भुईमूग, सोयाबीनची पेरणी सुरू असून, भातरोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. अद्याप जिल्ह्यात भाताच्या लागवडीला वेग आलेला नाही. 

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने चारही धरणांत मिळून सुमारे चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही पाऊस ओसरला होता. वरसगाव धरण क्षेत्रात १७, पानशेत धरण क्षेत्रात ११, टेमघर धरण क्षेत्रात ३०, पवना धरण क्षेत्रात ३०, मुळशी धरण क्षेत्रात १०, भामा आसखेड धरण क्षेत्रात १०, वडिवळे धरण क्षेत्रात १७, नीरा देवघर धरण क्षेत्रात २३, माणिकडोह धरण क्षेत्रात १०, तर येडगाव धरण क्षेत्रात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित धरणक्षेत्रात मुख्यत: उघडीप होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT