Rain In Sonpeth taluka
Rain In Sonpeth taluka  
मुख्य बातम्या

सोनपेठ तालुक्यात गारपिटीने नुकसान

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील करम, निळा, वंदन, वडगाव स्टेशन आदी गावांत शुक्रवारी (ता.१९) गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिके, फळपीके, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी सोनपेठ तालुक्यात तसेच गंगाखेड तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात ज्वारीची सुगी सुरु आहे. कापणी केलेल्या पेंढ्यांची पसर शेतामध्ये पडलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कणसे खुडून खळे करण्यासाठी शेतामध्ये ढीग लावले आहेत. कापणी केलेला गहू शेतात आहे. उशिरा पेरणी केलेली ज्वारी, गव्हाची पिके उभी आहेत. हळद काढणी, शिजवणी, वाळवणीची कामे देखील सुरु आहेत.

गारपीट, वादळी वाऱ्यामुळे कलिंगड, संत्री, आंबा आदी फळपिके, टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळच्या  सुमारास झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले. फुटलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले, असे निळा येथील शेतकरी मुंकुदराव सोळंके आणि करम येथील रमेशराव तिवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये चिंता

जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू पीकांची सुगी, हळद काढणी आदी कामे सुरू आहे.अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पीकांच्या नुकसानीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात गुरुवार (ता.१८) ते रविवार (ता.२१) या कालावधीत वीजाच्या कडकडात पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी रात्री सेलू तालुक्यात तसेच अन्य काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वेगाच्या वाऱ्यामुळे पीके आडवी झाली.अनेक ठिकाणी फळपीके, भाजीपाला पीकांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT