विदर्भात आज, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या पावसाचा अंदाज
विदर्भात आज, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या पावसाचा अंदाज  
मुख्य बातम्या

विदर्भात आज, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भात आज (ता. २६) हलक्या पावसाची शक्यता असून, उद्या (ता. २७) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे.  यात आर्वी, सावनेर, सेलू, कुही, खारंघा, आमगाव, पारशिवाणी प्रत्येकी २०, नागपूर, रामटेक, कामठी, सालकेसा, भंडारा, मोहाडी, हिंगणा, देवळी, गोंदिया, भिवापूर, वर्धा, मौदा, गोरेगाव, कळमेश्वर प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयातर्फे सांगण्यात आले. तर नागपूरमधील मौदा, खात, देवमुंढरीत गुरुवारी सायंकाळी बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातही गारांचा पाऊस झाला.  दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या स्थितीपासून मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरही ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत, तर उद्या (ता. २७) उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे.  उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्र आणि कोकणच्या किमान तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली घसरले आहे. नगर, नाशिक, पुण्यात किमान तापमान ९ अंशांच्या आसपास असून, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.    शुक्रवारी (ता. २५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ९.३ (-२), नगर ९ (-३), जळगाव १२.० (-१), कोल्हापूर १५.८ (१.०), महाबळेश्‍वर ११.५ (-२), मालेगाव ११.८ (१), नाशिक ९.२ (-१), सांगली १३.८ (०), सातारा १०.४ (-३), सोलापूर १६.४ (०), सांताक्रूझ १३.४ (-३), अलिबाग १५.५ (-२), रत्नागिरी १५.० (-४), डहाणू १६.१ (-१), आैरंगाबाद १३.० (१), परभणी १७.२ (२), नांदेड १६.० (२), अकोला १६.४ (२), अमरावती १४.८ (०), बुलडाणा १३.६ (-१), चंद्रपूर १५.४ (०), गोंदिया १५.२ (२), नागपूर १५.९ (२), वर्धा १६.७० (३), यवतमाळ १३.४ (-२). शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (स्रोत - कृषी विभाग) : यवतमाळ : बाभूळगाव २९, घारफळ १३, माणिकवाडा ५, मालखेड ४, शिवणी १. वर्धा : आर्वी ५, वाथोडा १५, वाढोणा २७, खारंघा २७, विरूळ ९, रोहणा १८, सारवडी ४, कन्नमवरग्राम ४७, आष्टी १२, साहूर ८.  नागपूर : गुमगाव १६, टकलघाट १०, खापा ४, पाटनसावंगी १३. गोंदिया : देवरी ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

SCROLL FOR NEXT