पाऊस अंदाज
पाऊस अंदाज  
मुख्य बातम्या

उद्यापासून पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. गुरुवारपासून (ता. १८) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १७) कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता. हा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. कोकण आणि घटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी येत आहेत. मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारपासून विदर्भात पाऊस वाढणार असून, मराठवाड्यातही पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे.   मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : चिपळूण ११०, संगमेश्वर १००, पोलादपूर, वैभववाडी प्रत्येकी ९०, राजापूर ८०, रत्नागिरी, लांजा प्रत्येकी ७०, वेंगुर्ला, गुहागर, कणकवली, खेड प्रत्येकी ५०, दोडामार्ग, श्रीवर्धन, मुरूड, सावंतवाडी प्रत्येकी ४०, देवगड ३०.  मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ८०, महाबळेश्वर, राधानगरी प्रत्येकी ४०, पाटण, पन्हाळा प्रत्येकी २०.  घाटमाथा : कोयना नवजा १००, शिरगाव, कोयना पाफळी प्रत्येकी ६०, दावडी ५०, आंबोणे ४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT