Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

गुरूवारपर्यंत पाऊस शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीठ, मेघगर्जना व विजांच्या कटकडाटसह पाऊस होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातही गुरूवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे अनेक ठिकाणी पहाटेचा गारठा कमी झाला असल्याने कमाल तापमानासह, किमान तापमानातही किंचित घट झाली आहे. येत्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात अंशत ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल. 

विदर्भ व परिसर आणि मध्यप्रदेश या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागात कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत बीड येथे ३८.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.  शनिवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३३.२ 
  • अलिबाग ३१.४ 
  • रत्नागिरी ३४.१ 
  • डहाणू ३३.५ 
  • पुणे ३५.७ 
  • जळगाव ३५.० 
  • कोल्हापूर ३५.९ 
  • महाबळेश्वर ३०.० 
  • नाशिक ३४.९ 
  • सांगली ३६.५ 
  • सातारा ३५.५ 
  • सोलापूर ३७.८ 
  • औरंगाबाद ३५.० 
  • परभणी ३६.० 
  • नांदेड ३३.० 
  • बीड ३८.२ 
  • अकोला ३३.३ 
  • अमरावती ३१.६ 
  • बुलडाणा ३४.० 
  • ब्रम्हपुरी ३४.९ 
  • चंद्रपूर ३५.० 
  • गोंदिया ३२.० 
  • नागपूर २९.४ 
  • वर्धा ३२.८
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT