हलका ते मध्यम पावसाची शक्यता 
हलका ते मध्यम पावसाची शक्यता  
मुख्य बातम्या

हलका ते मध्यम पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता.२३) कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

दोन ते तीन दिवसांपासून तयार झालेली चक्रवाताची स्थिती उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी व उत्तर कोकण परिसरात अजूनही कायम आहे. मात्र, स्थितीची तीव्रता फारशी सक्रिय नाही. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे. परंतु खानदेशातील व मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. वऱ्हाडातही हलक्या पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भात उद्या मुसळधार शक्य  उद्या (ता.२५) औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी होतील. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह  जोरदार पाऊस पडेल. तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT