hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी पाऊस पडत आहे. शनिवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. २९) राज्यात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा असून, कोकणातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत, हंगामात प्रथमच पारा ४० अंशांच्या वर गेला. मात्र पावसाळी वातावरण व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ- उतार सुरू असल्याचे चित्र आहे. विदर्भाच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३८ अंशांदरम्यान आहे, शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात तापमान ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. 

दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढग जमा होत आहेत. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. आज (ता.२९) राज्याच्या अनेक भागात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१९.८), जळगाव ३२.० (२१.२), कोल्हापूर ३५.६ (२३.६), महाबळेश्‍वर २८.१ (१८.४), मालेगाव ३०.८, नाशिक ३३.१ (१९.७), निफाड ३२.० (१७.०), सांगली -(२३.०), सातारा ३७.१ (२३.५), सोलापूर ३९.१ (२३.६), डहाणू ३२.९ (२४.७), सांताक्रूझ ३५.४ (२३.२), रत्नागिरी ३३.४ (२५.०), औरंगाबाद ३४.० (१९.२), परभणी - (२२.५), अकोला ३८.०(२१.५), अमरावती ३६.४ (२१.६), बुलडाणा ३२.२ (२०.६), ब्रह्मपूरी ३८.९ (२३.४), चंद्रपूर ३८.५ (२१.०), गोंदिया ३५.५ (२१.०), नागपूर ३७.० (२१.९), वर्धा ३७.५ (२३.५). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT