hawaman
hawaman  
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान चाळीशीपार असल्याने कडक उन्हाळा जाणवत आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा वाढलेला चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, विदर्भासह, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानाचा पारा ४१ ते ४४ अंशांदरम्यान राहणार आहे. अकोला येथे तापमान सातत्याने ४४ अंशाच्या वर आहे. तर विदर्भाला ऊन अक्षरशः भाजून काढत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही चटका चांगलाच वाढला आहे. विदर्भापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण अंदमान समुद्र, सुमात्राच्या किनारपट्टी परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. बुधवारपर्यंत (ता.१३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.६, जळगाव ४३.५, धुळे ४२.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्‍वर ३३.५, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.१, निफाड ४०.१, सांगली ३९.८, सोलापूर ४१.७, डहाणू ३४.३, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३४.३, औरंगाबाद ४१.७, परभणी ४३.०, नांदेड ४२.०, अकोला ४४.३, अमरावती ४३.२, बुलडाणा ४१.६, ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४३.५, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.९, वर्धा ४२.८, यवतमाळ ४३.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT