राज्यात शनिवारपासून वळिवाचा अंदाज
राज्यात शनिवारपासून वळिवाचा अंदाज  
मुख्य बातम्या

राज्यात शनिवारपासून वळिवाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : उन्हाच्या चटक्याने तापलेल्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शुक्रवारपासून (ता. ३१) कोकणात तर शनिवारपासून (ता. १) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  पूर्वमोसमी पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वरच राहिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले होते. विदर्भात तर अनेक ठिकाणी तापमानाच पारा सातत्याने ४६ अंशांच्या पुढेच राहिला आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या अभावामुळे, समुद्रावरून बाष्पपुरवठा न झाल्याने राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडलेला नाही. कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढून उष्ण लाटेची स्थिती आहे. मंगळवारी (ता. २८) ब्रह्मपुरी आणि नागपूर येथे उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.   मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान होण्यास सुरवात झाली आहे. वाऱ्यांची दिशा बदलत असून, पश्चिमेकडून वारे वाहण्याचे संकेत आहेत. यातच अरबी समुद्रावरून बाष्पपुरवठा होऊन राज्यात पावसाला पोषक हवामान होणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तर शनिवारी (ता. १) दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

अंदमानात मॉन्सूनची प्रगती शक्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली. त्यांनतर मॉन्सूनने कोणतीही वाटचाल केलेली नाही. दरम्यान, गुरुवारपर्यंत (ता. ३०) मॉन्सून अंदमान बेटांच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.९ (३.०), जळगाव ४३.२ (१.०), कोल्हापूर ३८.२(३.४), महाबळेश्वर ३३.१ (४.६), मालेगाव ४२.२ (२.९), नाशिक ३८.१ (१.१), सांगली ३९.६ (३.४), सातारा ४०.८ (५.८), सोलापूर ४३.०(३.५), अलिबाग ३६.९ (३.६), डहाणू ३५.१ (०.८), सांताक्रूझ ३४.२ (०.७), रत्नागिरी ३४.० (१.२), औरंगाबाद ४२.० (३.२), परभणी ४६.१ (४.७), अकोला ४५.३ (३.५), अमरावती ४५.० (३.०), बुलडाणा ४१.५ (३.८), बह्मपुरी ४६.७ (३.९), चंद्रपूर ४६.४ (३.१), गोंदिया ४४.८ (२.०), नागपूर ४६.७ (३.९), वाशीम ४३.८, वर्धा ४६.५ (३.९), यवतमाळ ४५.०(३.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT