गुढे पाचगणी, ता. शिराळा : परिसरात झालेली गारपीट.
गुढे पाचगणी, ता. शिराळा : परिसरात झालेली गारपीट. 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. बुधवार आणि गुरुवारी विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढू लागल्याने मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. उद्यापासून विदर्भात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असल्याने तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मंगळवार (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.२, नगर ४१.८, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.५, सांगली ३८.२, सातारा ३८.८, सोलापूर ४०.३, मुंबई ३२.८, अलिबाग ३१.९, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३३.७, आैरंगाबाद ४०.२, परभणी ४०.५, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ४३.७, गोंदिया ३९.८, नागपूर ४२.०, वर्धा ४१.५, यवतमाळ ४०.५. अनेक ठिकाणी गारपीट राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी (जि. सातारा) येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील संगमनेर, कर्जत आणि पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली. सिन्नर तालुक्यात (जि. नाशिक) अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पुणे, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली. वादळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे नुकसान झाले तसेच झाडांची पडझड झाली. गुढे पाचगणी पठारावर (जि. सांगली) सोमवारी (ता. १६)  सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सुमारे दीड ते दोन तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्याने गुढे पाचगणी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT