कोल्हापुरात पाऊस, धुक्‍याने झेंडू उत्पादक मेटाकुटीला
कोल्हापुरात पाऊस, धुक्‍याने झेंडू उत्पादक मेटाकुटीला 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात पाऊस, धुक्‍याने झेंडू उत्पादक मेटाकुटीला

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : ऊन पावसाच्या खेळाचा फटका फूल उत्पादनाला बसत असल्याने याचा परिणाम झेंडू फूल उत्पादकांना झेलावा लागत आहे. ऐन दसऱ्यातच फुले काढणीत अडथळे येत असल्याने झेंडू फुले काढणी करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. ६) व सोमवारी (ता. ७) झेंडू उत्पादकांना किलोस ३० ते ४० रुपयांपर्यंत दर मिळाला.

अत्यंत चांगल्या दर्जाच्या झेंडूला ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. महापुरानंतर मुंबईतील बाजारपेठांमध्ये झेंडू जाण्याचे प्रमाण थांबले होते. गणेशोत्सव झाल्यानंतर झेंडूचे दर २० रुपये किलोपर्यंत घसरले होते. त्यानंतर मुंबईत इतर भागातून झेंडू येत असल्याने दक्षिण महाराष्ट्रातून झेंडूची मागणी कमी राहिल्याचे झेंडू उत्पादकांनी सांगितले. 

यामुळे मिरज, इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव आदी शहरांमध्ये झेंडूची विक्री करण्याला उत्पादकांनी प्राधान्य दिले. दसऱ्यामुळे उत्पादकांना किलोला ४० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान सोमवारी (ता. ८) किरकोळ विक्रेत्यांकडून मात्र झेंडूची विक्री ५० ते ७० रुपये किलोने केली जात होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT