july rain  
मुख्य बातम्या

जुलैअखेर पावसाने सरासरी गाठली

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवात यंदा दमदार झाली. मात्र जुलै महिन्यात धरणाच्या पाणलोटासह राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली. तर मराठवाड्यासह दुष्काळी पट्ट्यात दमदार पाऊस झाला आहे.

Amol kutte

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवात यंदा दमदार झाली. मात्र जुलै महिन्यात धरणाच्या पाणलोटासह राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली. तर मराठवाड्यासह दुष्काळी पट्ट्यात दमदार पाऊस झाला आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राज्यात ५६३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाल्याने, जुलैमध्ये खंड पडूनही राज्यात १०५ टक्के नोंद होत पावसाने सरासरी गाठल्याचे स्पष्ट होत आहे. जुलैअखेर नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, सरासरीपेक्षा (११० टक्के) अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ९३ टक्के अधिक, सोलापूरमध्ये ९० टक्के अधिक, बीडमध्ये ८८ टक्के अधिक पावसाने हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात ५१ टक्के अधिक, लातूरमध्ये ३९ टक्के, सिंधुदुर्ग ३३ टक्के, उस्मानाबाद ३१ टक्के, जळगाव २९ टक्के, परभणी २६ टक्के, वाशिममध्ये २५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत उणे ४५ टक्के पाऊस पडला आहे. नंदूरबार जिल्ह्यात उणे ३३ टक्के, पालघर उणे २९ टक्के, गडचिरोली उणे २५ टक्के, भंडारा उणे २१ टक्के, अकोला उणे २० टक्के पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) देशभरात १०४ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या काळात राज्यातही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

घाटमाथ्यावर दडी, दुष्काळी पट्ट्यात यंदा दमदार दरवर्षीच्या हंगामात नवनवीन रंग दाखविणारा मॉन्सून यंदाही काहीसा वेगळा असल्याचे दिसून आले आहे. अति पावसाचा भाग असलेल्या घाटमाथा, प्रमुख धरणांचे पाणलोट क्षेत्र आणि लगतच्या जिल्ह्यात पावसाची दडी आणि दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र दमदार हजेरी हे मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्याचे (जून ते जुलै) वैशिष्ट्ये ठरले आहे. मॉन्सून देशभरात पोचल्यानंतर पावसाचा जोर वाढण्यासाठी कमी दाब क्षेत्रासारख्या आवश्यक वातावरणीय प्रणालींची निर्मिती झाली नाही. परिणामी अरबी समुद्रावरील बाष्पाने घाटमाथ्यापर्यंत ओढून आणण्यासाठी वाऱ्यांना अपेक्षित वेग वेग मिळाला नाही. त्यामुळे घाटमाथा आणि लगतच्या भागात पाऊस कमी झाला. तर मराठवाड्यासह पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात वातावरणात स्थानिक बदल होत विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत : हवामान विभाग)

विभाग  सरासरी पाऊस पडलेला पाऊस तफावत (टक्क्यांत)
कोकण १७५७.८ १७९८.२  
मध्य महाराष्ट्र  ३९७.८   ४४३.२   ११
मराठवाडा ३१७.१ ४४९.३ ४२
विदर्भ ४४७.७   ४२२.६  (-१२)

१ जून ते जुलैअखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (स्रोत : हवामान विभाग)

जिल्हा सरासरी पाऊस पडलेला पाऊस  तफावत (टक्क्यांत)
पालघर १३१६.९ ९३१.३  (-२९)
रायगड   १८६२.० १५५९.६    (-१६)
रत्नागिरी १९९५.१ २१२५.४ 
सिंधुदुर्ग  १९२३.७  २५५१.२  ३३
 ठाणे   १४०४.२  ११६८.२  (-१७)
नगर    २०५.७  ४३२.५   ११०
धुळे  २९२.३     ४४२.८ ५१
जळगाव  ३१२.९ ४०२.७ २९
कोल्हापूर    १०४८.४  ९०९.३  (-१३)
नंदुरबार  ४६१.५ ३०८.७ (-३३)
नाशिक   ४८३.३ ४७४.९   (-२)
पुणे  ४८५.५ ४८०.९   (-१)
सांगली २६४.५  २८७.७  ९
सातारा ५०१.३  ३६१.० (-२८)
सोलापूर  १९७.३ ३७५.७  ९०
औरंगाबाद  २७७.४  ५३६.०  ९३
बीड    २५६.१   ४८१.३ ८८
हिंगोली  ३९९.४ ४४९.० १२
जालना २९९.० ४५८.९  ५३
लातूर   ३२२.३  ४४७.२ ३९
नांदेड ३९९.६   ३९७.०  (-१)
उस्मानाबाद   २६४.०   ३४६.९ ३१
परभणी   ४५८.३  ३६४.५      २६
अकोला  ३६०.१    २८८.९   (-२०)
अमरावती  ४२३.१   ३८१.८    (-१०)
भंडारा  ५७१.९ ४५१.८  (-२१)
बुलडाणा ३३१.५   ३९१.८  १८
चंद्रपूर  ५४०.७ ५३७.४  (-१)
गडचिरोली   ६३८.८ ४७९.७  (-२५)
गोंदिया   ६०७.७ ३३२.८   (-४५)
नागपूर  ४७०.७   ४५१.८    (-४)
वर्धा   ४४७.७ ४३६.५  (-२)
वाशीम    ४१०.० ५१४.०  २५
यवतमाळ ४२०.६  ३४०.८ (-१९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT