अकोला फळबाग
अकोला फळबाग  
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंता

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल पडल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने या वर्षी बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.  

उघडीप दिल्याने चिंता  या खरीप हंगामात पेरणीमध्ये बुलडाणा जिल्हा सुरवातीपासून आघाडीवर आहे. या जिल्ह्यात ९० टक्क्‍यांवर पेरणी पोचली आहे.  वाशीम जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या. अकोल्यात पेरण्या ७५ टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत. पेरण्यांना विलंब होत असल्याने अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने आता कापूस व सोयाबीन लागवडीवर परिणामाची शक्यता दिसून येत आहे. काही ठिकाणी १० ते १२ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. अशा ठिकाणी हा खंड आणखी वाढल्यास पिके धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. काही शेतकऱ्यांनी हा अंदाज घेत सिंचनाचे काम सुरू केले आहे.       पाणीसाठा चिंताजनक वऱ्हाडातील काटेपूर्णा प्रकल्पात ३.९५ दलघमी साठा आहे. वान प्रकल्पात २६.१६, नळगंगा प्रकल्पात ७.२७, पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ आणि खडकपूर्णामध्ये शून्य दलघमी साठा आहे. मागील वर्षभर तीव्र पाणीटंचाई जाणवली होती. सध्या पावसाचा दीड महिना होऊनही नदी-नाल्यांना पाणी न वाहल्याने बहुतांश भागात टंचाई कायम आहे. बुलडाण्यात सव्वाशेपेक्षा अधिक टॅंकर बंद झाले ही दिलासादायक बाब आहे. या जिल्ह्यात बुलडाणा, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव तालुक्यांमध्ये आजवर चांगला पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई अद्याप कायम आहे. पातूर तालुक्यातील काही गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT