पाऊस
पाऊस  
मुख्य बातम्या

सतरा जिल्ह्यांत पावसाची दडी

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दमदार बरसणाऱ्या पावसाने अद्यापही विदर्भ, मराठवाड्यात ओढ दिली आहे. जुलै महिना उलटून, निम्मा पावसाळा संपत आला. तरीही अद्याप राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. २८ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. तर ६ जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यात पावसाची ओढ असल्याचे दिसून येते. मुंबईसह कोकणात पावसाने तडाखा दिल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली. अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना करावा लागला. तर मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत असलेल्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांची सरासरी भरून निघाली. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक धरणे अद्यापही तळशीच आहेत. थोड्याफार पावसाने खरीप पिकांना जीवदान दिले असले तरी, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची भीती आहे. हवामान विभागाकडील नोंदीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, तेथे सरासरीपेक्षा ८२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे ५२ टक्के पाऊस पडला आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी ओलांडली आहे. जळगाव, नंदूरबार, सांगली, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. पावसाने ओढ दिलेले जिल्हे, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (टक्के) : सोलापूर (-४२), जालना (-२३), बीड (-४२), उस्मानाबाद (-३०), परभणी (-३५), लातूर (-३८), हिंगोली (-३५), नांदेड (-३३), अकोला (-२२), अमरावती (-३१), वाशीम (-४०), यवतमाळ (-५२), वर्धा (-२८), चंद्रपूर (-३१), भंडारा (-३८), गोंदिया (-४०), गडचिरोली (-३१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT