dam
dam  
मुख्य बातम्या

धरणक्षेत्रांत पावसाचा जोर 

टीम अॅग्रोवन

पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुलसी, तानसा, मध्य वैतरणा, भातसा धरणांत आवक वाढली आहे. सध्या कोकणात व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. धारावी या घाटमाथ्यावर सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

भीमा खोरे पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. वडीवळे, डिंभे, निरा देवधर, कृष्णा खोरेच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक होता. पाटगाव, कासारी, राधानगरी, कोयना, तारळी, दूधगंगा या धरणाच्या खोऱ्यांत अधिक पाऊस पडल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे-नाले आता खळखळून लागले असून, धरणात विसावू लागले आहेत. धरणात नव्याने २७३ दलघफू पाणी दाखल झाले. या धरणातून विद्युतगृह क्रमांक एकमधून ८४० ने विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपासून या भागात अधूनमधून रिपरिप सुरू होती. या पावसाची बऱ्यापैकी चांगली नोंद झाली आहे. पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी शेती कामांत गुंतला आहे. 

मराठवाड्याला वरदान असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. मात्र काही भागांत झालेल्या पावसामुळे ०.७४४ टीएमसी (अंदाजे) आवक झाली आहे. विदर्भातही काही भागांत पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा झाला असला तरी धरणांत नव्याने फारशी आवक सुरू झालेली नाही.  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोर  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथ्यावर धारावी येथे ११० मिलिमीटर, कोयना ६०, लोणावळा ५०, ताम्हिणी, डुंगरवाडी ४० मि.मी. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २१० मि.मी., विहार १३०, तानसा ८०, मध्य वैतरणा ६०, वैतरणा ५०, भातसा, अप्पर वैतरणा क्षेत्रात ३० मिलिमीटर पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT