संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच

टीम अॅग्रोवन

सातारा   : जिल्ह्यातील माण, फलटण या तालुक्यांचा अपवाद इतर सर्व तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत (ता. १२) सरासरी  २१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. महाबळेश्वरसह पाटण, जावळी व सातारा या तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. कराड, खंडाळा, वाई, कोरेगाव, खटाव तालुक्यांतही हलका ते मध्यम पाऊस झाला. माण व फलटण तालुक्यांना पावसाने बुधवारी पुन्हा हुलकावणी दिली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

धरण क्षेत्रातील कोयना येथे १२७, नवजा येथे १३०, महाबळेश्वर येथे ९१ मिमी पावसाची नोंद झाली.  गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठयात ३.२१ टीएमसीने झाली आहे. कोयना धरणात ५३.०३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ५०.३८ टक्के भरले आहे.

तालुकानिहाय पाऊस मिमी ः सातारा १६.६, जावली  २७.७, पाटण ३२, कराड  ७.२, कोरेगाव  ४.४, खटाव २.३, माण ०, फलटण  ०, खंडाळा  ७.४, वाई ७.२, महाबळेश्वर १३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT