पावसाची हजेरी
पावसाची हजेरी 
मुख्य बातम्या

महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्‍यात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन

सातारा  : जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. इतर सर्व तालुक्‍यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १५.८  मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई या तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. या तालुक्‍यांत अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. या तालुक्‍यात भर पावसात भात लागवडीचे काम वेगात सुरू आहे; तसेच सातारा व कराड तालुक्‍यात पावसाचा जोर कमी झाला आहे.

माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. या धरण क्षेत्रातील कोयना येथे ९५, नवजा येथे ९६ व महाबळेश्वर येथे ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात एकूण ४६.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात गत २४ तासांत २.९१ टीएमीसीने वाढ झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः सातारा ५.९, जावली १८.८, पाटण २०.५, कराड २.५, कोरेगाव २, खटाव १.२ , माण ०.१, फलटण  १.७, खंडाळा  ९.१, वाई ११.७, महाबळेश्वर १००.७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT