Rain in 142 circles in Nanded, Parbhani, Hingoli district
Rain in 142 circles in Nanded, Parbhani, Hingoli district 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२ मंडळांमध्ये मंगळवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील ७६ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. अर्धापूर, हादगाव, माहूर, किनवट, हिमायतगनर तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात चालू महिन्यात आजवर सरासरी ७२ मिमी म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ८२ टक्के पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३६ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिंतूर, सेलू , पूर्णा तालुक्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.

या महिन्यात आजवर सरासरी ४९ मिमी म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ६०.६ टक्के पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. सर्व पाच तालुक्यातील अनेक मंडळामध्ये पावसाचा जोर होता. चालू महिन्यात आजवर सरासरी ६४.४ मिमी म्हणजेच अपेक्षित पावसाच्या ७५.२ टक्के पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (२० मि.मीपुढे) 

नांदेड जिल्हा ः विष्णुपुरी २०, अर्धापूर ३३.१, दाभड २४, मालेगाव ४२.३, हादगाव २४.८, तळणी २४.८, निवघा २४.८, पिंपरखेड ३९.८, आष्टी २४.८, माहूर ३५.३, वाई ६९.५, सिंदखेड ३५.३, जवळगाव २५,३, मोघाली ३६.३.

परभणी जिल्हा ः जिंतूर ४५.३, सावंगी म्हाळसा ४८, बामणी २२.३, आडगाव ३६, चारठाणा १६, वालूर २९, पूर्णा २२, कात्नेश्वर ३२.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ५७.३, नरसी २५.५, सिरसम ३३, बासंबा ३१.३, माळहिवरा ४२.५, खंबाळा ४२.३, कळमनुरी २५,३, नांदापूर २३.३, आखाडा बाळापूर ३२,वारंगा २७.५,वसमत २८, हयातनगर ३५.५, गिरगाव ३१.३, हट्टा २८.५, टेंभुर्णी २८.५, औंढा नागनाथ २३.५, येळेगाव ३७, जवळा २२, सेनगाव ४६, गोरेगाव २६.५,साखरा ३४, पानकनेरगाव २९.८, हट्टा ४६.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT