पंजाबमध्ये रेल्वेसेवा सुरू होणार Railway service will start in Punjab
पंजाबमध्ये रेल्वेसेवा सुरू होणार Railway service will start in Punjab 
मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलकांनी दिली सवलत; पंजाबमध्ये रेल्वेसेवा सुरू होणार

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली,  : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केल्यानंतर पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलकांनी थेट रेल्वेमार्गांवरच ठिय्या मारल्यामुळे मागील सुमारे ५५ दिवसांपासून रेल्वे सेवा बंद होती. शेतकऱ्यांनी आजपासून (ता. २३) आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आज रात्रीपासून रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून  दिली आहे. दरम्यान, १५ दिवसांत आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.  मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून म्हटले आहे, ‘‘किसान युनियनने पंजाबमधील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आज रात्रीपासून रेल्वे सेवा सुरू होईल.  अनेक दिवस शेतकरी रेल्वेमार्गावर ठिय्या मारुन होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला रेल्वेगाड्या ६० किलमोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावतील. रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याची खात्री होताच पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल. पहिल्यांदा चाचणी म्हणून आठ गाड्या पंजाबसाठी आणि नऊ गाड्या कटारा आणि जम्मूसाठी सुरू होतील.

सुमारे २२२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पंजाबमध्ये सुमारे ५५ दिवसांपासून रेल्वेसेवा बंद होती. परिणामी रेल्वेचे सुमारे २२२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फक्त उत्तर रेल्वेला रोज १४.८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलनामुळे पंजाबमध्ये ९६ रेल्वे इंजिन अडकून पडली होती आणि एकूण २ हजार ३५२ गाड्याची वाहतूक प्रभावित झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT