राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभा
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभा 
मुख्य बातम्या

राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभा

टीम अॅग्रोवन

नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे व नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ काॅँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी (ता. २६) संगमनेरमध्ये सभा होणार आहे. शहरातील जाणता राजा मैदानावर सायंकाळी पाच वाजता ही सभा होईल, अशी माहिती काॅँग्रेसचे स्टार प्रचारक तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.  पक्षातर्फे आज सभेची वेळ निश्‍चित करण्यात आली. ज्येष्ठ नेते थोरात यांच्या आग्रहास्तव या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. गांधी यांनी काॅँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जाहीर सभेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व आहे. तथापि, सभेच्या नियोजनासाठी पक्षाकडे अत्यंत कमी वेळ असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्याशिवाय प्रशासनाचीदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने पळापळ सुरू झाली आहे.  काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. संगमनेर तालुका काॅँग्रेस कमिटीतर्फे सभेचे नियोजन सुरू करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जाणता राजा मैदानाची बुधवारी पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT