मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याच्या विक्रमी पेरणीचे संकेत

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात यंदा हरभऱ्याची विक्रमी पेरणी होईल, असे संकेत असून, गुलाबी बोंड अळीग्रस्त कपाशीचे क्षेत्र रिकामे करून हरभरा पेरणीचा सपाटा सुरू आहे. पेरणी आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ८४ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे उद्दिष्ट कृषी विभागाने ठरविले आहे. पेरणीला दिवाळीनंतर वेग आला. दिवाळीपूर्वी आठवडाभरापासून दादर (ज्वारी), हरभरा व मक्‍याची पेरणी सुरू झाली होती.

सोयाबीन, उडीद, मुगाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रावर ही पेरणी सुरू होती. त्यातच दिवाळीनंतर कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढला. पूर्वहंगामी कपाशीवर हा प्रादुर्भाव अधिक होता. मजूर अळीग्रस्त कापूस वेचत नाही. मजुरी अधिक लागेल आणि उत्पादनही हवे तसे येणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र रिकामे करायला सुरवात केली. त्यात कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभरा पिकाला शेतकरी पसंती देत असून, हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे. २४ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी जिल्ह्यात ३० हजार हेक्‍टरवर गहू पेरणी अपेक्षित अाहे. सद्यःस्थितीत सुमारे २४ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तापी काठावरील गावे आणि मुबलक कृत्रिम जलसाठे असलेल्या भागात गव्हाची पेरणी सुरू आहे. आणखी १० ते १२ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येणार असल्याने अनेक शेतकरी गहू पेरणीसाठी शेत तयार करणे व इतर व्यवस्था करत असल्याची माहिती आहे. मका पेरणीलाही वेग पुरेसा चारा व उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाची पेरणी व लागवडही वेगात सुरू आहे. यंदा रावेर, यावल भागात मका पीक कमी असले तरी जळगाव, चोपडा, पाचोरा भागात मका लागवड किंवा पेरणी अधिक दिसून येत आहे. आवर्तनांचा लाभ जिल्ह्यात वाघूर, अनेर व हतनूर प्रकल्पांमधून रब्बीसाठी आवर्तन सोडले आहे. त्यामुळे हरभरा पेरणीला आणखी वेग आला आहे. हतनूर धरणाचा लाभ रावेर, यावल, चोपडा या तालुक्‍यांना होत आहे, तर अनेरचा लाभ चोपडा तालुक्‍यास आहे. वाघुरमुळे भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील गावांना लाभ झाला आहे. वाढत थंडी पिकांसाठी पोषक जिल्ह्यात थंडी वाढू लागली असून, तिचा लाभ रब्बी पिकांना चांगला होत आहे. पहाटे दवबिंदू पडू लागले आहेत. हरभरा, रब्बी ज्वारी जोमात आहे. चोपडा, जळगाव भागातील काळ्या कसदार जमिनीमधील दादर निसवू लागली आहे.

दादरचा हंगाम यंदा बरा दिसत आहे. कोरडवाहू हरभराही जोमात असून, यंदा चांगले पीक येईल, अशी अपेक्षा आहे. - सुरेश पाटील, शेतकरी, नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT