रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच बोलबाला  Rabbi will stay this year as well The sway of the gram
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच बोलबाला  Rabbi will stay this year as well The sway of the gram 
मुख्य बातम्या

रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच बोलबाला 

टीम अॅग्रोवन

अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या हंगामाच्या दृष्टीने कृषी खात्याने नियोजनही केले. वऱ्हाडात याही हंगामात पुन्हा एकदा हरभऱ्यावरच शेतकऱ्यांचा जोर राहील, असा अंदाज आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे.  पाऊस ओसरताच खरिपातील सोयाबीनची काढणी वेगाने होत आहे. सोयाबीनच्या खाली होणाऱ्या शेतात बहुतांश शेतकरी हरभऱ्याची लागवड करीत असतात. रब्बीत हरभऱ्याचे खात्रीशीर पिकही येत असल्याने दर वर्षी हा पेरा वाढतोच आहे. यंदा वऱ्हाडात पाऊसही अधिक झालेला आहे. शिवाय सर्वच प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणी आहे. विहिरींची पातळीही वाढलेली असल्याने सिंचनासाठी पाण्याची अडचण राहलेली नाही. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.  प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याची १ लाख ९९ हजार हेक्टरपर्यंत लागवड अपेक्षित आहे. गेल्या हंगामात याच जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाली होती. तुलनेने हे क्षेत्र यंदा आणखी काही हजार हेक्टरने वाढून कदाचित दोन लाख हेक्टरचा आकडा पार करू शकेल, अशी परिस्थिती आहे.  अकोल्यात गेल्या हंगामाच्या तुलनेने सहा हजार हेक्टरची वाढ होऊ शकते. गेल्या वेळी ९४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. या वर्षी १ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकेल. वाशीम जिल्ह्यात मागील रब्बीत ६० हजार हेक्टरवर पेरणी होती. ती यंदा ६५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. 

गव्हाच्या लागवडीत घट  रब्बीत गव्हाची पेरणी तीनही जिल्ह्यांमध्ये घट होईल, अशी दर्शविण्यात आली आहे. बुलडाण्यात गेल्या वर्षी ७९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गव्हाचे क्षेत्र तेथे ७५ हजार राहू शकते. अकोल्यात २१७९०च्या तुलनेत २० हजार हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ३७८१०च्या तुलनेत ३५ हजार हेक्टरवर पेरणी होईल, अशी शक्यता आहे. 

करडईची लागवड वाढणार  शासनाने या हंगामात महाज्योती अभियानांतर्गत तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे हंगामात तीनही जिल्ह्यांत करडईची लागवड पाच हजार हेक्टरवर करण्याचे नियोजन आहे. यात अकोल्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, तर बुलडाणा १८०० आणि वाशीम जिल्ह्यात १२०० हेक्टरवर पेरणी होऊ शकेल. 

मका पिकाचे वाढीव नियोजन  विदर्भात सर्वाधिक मका बुलडाणा जिल्ह्यात घेतल्या जातो. यंदाच्या रब्बीत या जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या हंगामात ११ हजार ८२० हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. अकोल्यातही ५२० हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १०९१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्हानिहाय रब्बी नियोजन  जिल्हा गेल्या हंगामातील लागवड यंदाची प्रस्तावित लागवड  बुलडाणा ३०४१४४ ३०२४७  अकोला ११६९७८ १२६३८०  वाशीम ९९८४५ १०३६०० हेक्टर    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT