वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी 
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख हेक्टरचे नियोजन असून, अपेक्षेप्रमाणे यंदाही हरभऱ्याची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज आहे. यंदाची परिस्थिती रब्बीसाठी पोषक असल्याने कृषी विभागाने एक लाख हेक्टरचे नियोजन केले आहे.

पावसामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक लागवड क्षेत्र होते. जवळपास ८० टक्क्यांवर क्षेत्र बाधित झाले. या अडचणीतून मार्ग काढत शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. जिल्हयात रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, वाशीम, मंगरुळपीर या सर्वच तालुक्यांमध्ये रब्बीचा हंगाम कमी-अधिक प्रमाणात साधला जातो. अतिपावसामुळे सध्याही जमिनीत ओल टिकून आले. जेथे वाफसा झाला, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागत करून लागवड सुरू केली.

हरभरा, गहू पेरणीच्या कामाला जिल्ह्यात सुरवात झाली आहे. या तीन पिकांची प्रामुख्याने रब्बीत लागवड केली जाते. मागील हंगामात ७९५१२ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाची परिस्थिती पाहता ही लागवड यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.  

यंदाचे नियोजित क्षेत्र (हेक्टर)

हरभरा ७२०००
गहू २५०००
रब्बी ज्वारी १०००
मका १०००

तालुकानिहाय रब्बी क्षेत्र (हेक्टर)

वाशीम  २०५५०
मालेगाव १४६००
रिसोड ३०६००
मंगरुळपीर ११५००
मानोरा ११४००
कारंजा ११३५०
एकूण १०००००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT