Rabbi sowing up to 2.5 lakh hectares in Jalgaon
Rabbi sowing up to 2.5 lakh hectares in Jalgaon 
मुख्य बातम्या

जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी पेरणी

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, ज्वारी, मका, बाजरी आदी पिके वाया गेली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका आदी पिकांच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची मदार असून, सद्यःस्थितीत दोन लाख ३८ हजार ७३ हेक्टरनुसार सरासरी ११८ टक्के क्षेत्रावर रब्बी वाणांची लागवड झाली आहे. 

सर्वांत जास्त पेरणी चोपडा तालुक्यात, तर सर्वांत कमी बोदवड तालुक्यात झाली आहे. रब्बीचे उत्पादन यंदा वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे तूर्त चित्र आहे. जिल्ह्यात सध्या थंडी असून, हवामान स्वच्छ व कोरडे आहे. तापमान सरासरी १३ ते २३ अंशांदरम्यान आहे. या थंड वातावरणाचा गहू, हरभरा, भुईमूग यांसह अन्य रब्बी पिकांच्या वाढीस बऱ्यापैकी फायदा होत असून, बरीच पिके जोमदार वाढीस लागली आहेत. जिल्ह्यात दोन लाख ३८ हजार ७३ हेक्टरवर रब्बी वाणांची लागवड झाली आहे. त्यात ४५ हजार ५५२ हेक्टरवर गहू, ३६ हजार २६९ हेक्टरवर ज्वारी, ८३ हजार २६७ हेक्टरवर हरभरा, ६७ हजार २९७ हेक्टरवर मका, तीन हजार ५९८ हेक्टरवर सूर्यफूल, एक लाख ५० हजार ८०१ क्षेत्रावर अन्य तृणधान्य, असे एकूण दोन लाख ३४ हजार १०४ हेक्टरवर रब्बी वाणांची लागवड झाली आहे. 

जवस, तीळ, ऊस आदी वाणांसह दोन लाख ३८ हजार ७३ हेक्टरनुसार सरासरी पेरण्या ११८ हेक्टरवर झाल्या आहेत. जमिनीत ओल असून, त्याचा फायदा रब्बी उत्पादनासाठी होत आहे. रब्बी हंगामांतर्गत चोपडा ३२ हजार ४० हेक्टर, त्याखालोखाल अमळनेर ३० हजार ९२२ हेक्टरवर ज्वारी, हरभरा, मका, आदी वाणांची सर्वांत जास्त नोंद आहे. यात सर्वांत जास्त ज्वारी वाणाची पेरणी ११ हजार ६२२ हेक्टरवर जळगाव तालुक्यात आहे. रावेर तालुक्यात १३ हजार ९२१ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. सर्वांत कमी यावल तालुक्यात ज्वारीची १०२ हेक्टरवर नोंद आहे.

 गहू पीक लागवडीकडे कल गव्हाची लागवड रावेर तालुक्यात सर्वाधिक आठ हजार ६८ हेक्टर, तर त्याखालोखाल चोपडा तालुक्यात सहा हजार २०१ हेक्टरवर गव्हाची लागवड आहे. सर्वांत कमी ९८७ हेक्टरवर पाचोरा तालुक्यात गव्हाची नोंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT