Rabbi onion cultivation on ten thousand hectares in Satara district
Rabbi onion cultivation on ten thousand hectares in Satara district 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर रब्बी कांदा लागवड

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची लागवड वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आतापर्यंत १० हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. खटाव तालुक्‍यात सर्वाधिक तीन हजार ५६७ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. दरातील तेजीमुळे कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांत रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून कांद्याचे दर तेजीत आहेत. कधी नव्हे तो कांदा शंभरावर गेला होता. सध्या कांद्यास क्विंटलला ३५०० ते ३७०० रुपये दर मिळत आहेत. दरातील तेजीमुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

परतीचा व अवकाळी पाऊस रब्बी हंगामाच्या सुरवातीस झाल्याने पाण्याची उपलब्धतता वाढली आहे. विशेषत दुष्काळी तालुक्यात पाऊस चांगला झाला असल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे या दुष्काळी तालुक्यांत कांद्याच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. दुष्काळी तालुक्‍यांव्यतिरिक्त सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी या पश्‍चिमेकडील तालुक्‍यातही कांद्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. या तालुक्‍यात कांद्यास आंतरपीक म्हणून प्राधान्य दिले जाते.

या वर्षी आतापर्यंत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी दहा हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. मागील दोन वर्षांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने तसेच दुष्काळामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. 

समाधानकारक दर

गुरुवारी सातारा बाजार समितीत नवीन कांद्यास ३००० ते ४२०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. जिल्ह्यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीत कांद्यास २५०० ते ३७५० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत.  

तरावाचे दर तेजीत

कांद्याच्या दरातील तेजीमुळे कांद्याच्या तरावाचेही दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांकडून मिळेल त्या दरात कांद्याच्या तरावाची खरेदी केली जात आहे. तरावाच्या वाफ्यास दोन हजारांपासून सहा हजारांपर्यंत दर मिळत आहेत. तसेच कोरडीत लागवड करण्याचा एकर सहा ते नऊ हजार रुपये मजुरांकडून घेतला जात आहे. यामुळे कांद्याच्या भांडवली खर्चात वाढ झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT