टंचाई स्थितीत चारा व्यवस्थापन मोहिमेस सुरवात
टंचाई स्थितीत चारा व्यवस्थापन मोहिमेस सुरवात 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरू

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी पिकांची होरपळ सुरू झाली आहे. एकीकडे जमिनीतील ओल तुटल्याने रब्बीची पिके वाळण्यास सुरवात झाली आहे. दुसरीकडे काही भागातील मोसंबीच्या बागाही कोमेजण्यास सुरवात झाली आहे. 

यंदा मराठवाड्यात १८ लाख ८६ हजार ५४० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी गृहीत होती. परंतु अत्यल्प झालेला पाऊस व त्यानंतर शाश्वती असलेल्या परतीच्या पावसानेही दिलेला दगा यामुळे यंदा मराठवाड्यातील रब्बीवर संक्रांत आली आहे. प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यात १३ डिसेंबरअखेरपर्यंत ७ लाख ४७ हजार ९०२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १९ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात ४६.६६ टक्‍के, बीड २३.२३ टक्‍के, लातूर ५७.५१ टक्‍के, उस्मानाबाद ४८.३७ टक्‍के, नांदेड ७४.३६ टक्‍के, परभणी ३४.३३ टक्‍के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४४.६९ टक्‍के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद कृषी विभागांतगर्त तीन जिल्ह्यात २ लाख ३ हजार ४३५ हेक्‍टरवर तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत ५ लाख ४४ हजार ४६७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणी झाली असली तरी पेरलेली औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पेरलेली ज्वारी बांड होणे, पूर्ण वाढ होण्याआधीच वाळण्याची प्रक्रिया होणे सुरू झाली आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी 
औरंगाबाद २,०८,१८७ ३९,६५९ 
जालना १,४१,३९२ ६५,९७९ 
बीड ४,२२,७३० ९७,७९७ 
लातूर १,९५,१६४ १,१२,२४५ 
उस्मानाबाद १,६०,३४८  ३,३१,४९६
नांदेड १,३६,५५६ १,०१,५४२ 
परभणी ३,०१,४३० १,०३,४८१ 
हिंगोली १,४९,५८५ ६६,८५१ 

जवळपास तीन एकरांवर रब्बी ज्वारीचं पीक घेतलं. ते कसबसं उगवून थोड वाढलं पणं आता मोठ्या प्रमाणात जमिनीतील ओल तुटल्यानं ते वाळून चाललयं. त्याला वाचविण्यासाठी सिंचनाची सोय नाही.  - किसन आंबीलवादे, शेतकरी, पारनेर, ता. अंबड, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT