रब्बीतही पीक कर्जवाटप रखडले
रब्बीतही पीक कर्जवाटप रखडले 
मुख्य बातम्या

रब्बीतही पीक कर्जवाटप रखडले

टीम अॅग्रोवन

अकोला : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्टही खरिपाप्रमाणेच रखडले अाहे. रब्बीत दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २० टक्केच पीक कर्जवाटप झाल्याची बाब समोर आली. 

अकोला जिल्ह्याचे रब्बी लागवड क्षेत्र एक लाख ११ हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यापैकी ६६ हजार ८९४ हेक्टरवर आजवर पेरणी झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. रब्बी लागवडीचा कालावधी लोटला. सुरवातीच्या काळात पेरणी झालेल्या हरभऱ्याची काढणीही झाली. असे असताना बँकांनी खरिपाप्रमाणेच रब्बीतही पीककर्ज देण्यात कुचराई केली.    

रब्बीसाठी जिल्हयात ७० कोटी २८ लाख रुपये उद्दिष्ट सर्व बँकांना मिळून देण्यात आले. ३१ डिसेंबरअखेर केवळ २० टक्क्यांपर्यंत पीक कर्जवाटप झाले. १५६८ शेतकऱ्यांना १४ कोटी ५६ लाख रुपये कर्ज मिळाले. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २७५ शेतकऱ्यांना ९० लाख, राष्ट्रीयीकृत बँकांनी ८९० शेतकऱ्यांना ७ कोटी ६९ लाख, खासगी बँकांनी ३०९ शेतकऱ्यांना पाच कोटी २६ लाख आणि ग्रामीण बँकांनी ९४ शेतकऱ्यांना ७१ लाख रुपये वाटप केले.  

आधीच खरिपाची उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. काही शेतकऱ्यांचा लागवडीवर झालेला खर्चसुद्धा निघाला नव्हता. खरिपाची कसर रब्बीत भरून काढता येईल, या उद्देशाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पाठबळ देण्याची गरज असताना बँकांनी नियमांचा आधार घेत हात आखडता घेतला. त्यामुळे पीक कर्जवाटप होऊ शकले नाही, हे आता स्पष्ट झाले.

खरिपातही ३० टक्के वाटप जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १३३४ कोटींचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्यक्षात ४१९ कोटी रुपये वाटपानंतरच हा हंगाम आटोपला. खरिपाचाच कित्ता बँकांनी रब्बीतही गिरवला. ७० कोटींच्या तुलनेत साडेचौदा कोटी रुपये वाटप केले.

पीक कर्जवाटप आकडेवारी

हंगाम उद्दिष्ट  प्रत्यक्ष वाटप
खरीप १३३४ कोटी ४१९.४७ कोटी
रब्बी ७० कोटी  १४.५६ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT