Rabbi on 21 lakh hectares in Marathwada
Rabbi on 21 lakh hectares in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात २१ लाख हेक्‍टरवर रब्बी

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद : खरीप हातचा गेलेल्या मराठवाड्यात आजवर सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र जवळपास १९ लाख १९ हजार हेक्‍टर आहे. तसेच तब्बल २१ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पोषक नसलेल्या वातावरणाचा परिणाम हरभऱ्यावर झाला आहे. त्यावर पाने खाणाऱ्या अळीचा, तर गव्हावर करप्याचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा रब्बीवर सुरुवातीपासून संकटाचे ढग कायम आहेत. वातावरणाने त्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे. मराठवाड्यात यंदा सर्वसाधारण क्षेत्र १९ लाख १९ हजार हेक्‍टर होते. प्रत्यक्षात २१ लाख ४२३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ७८० हेक्‍टर क्षेत्रासह उस्मानाबादमधील ३ लाख ३३ हजार ८३१ हेक्‍टर, परभणीमधील २ लाख ४७ हजार ५९६, हिंगोलीतील १ लाख ४ हजार १३१, नांदेडमधील २ लाख ३३ हजार ८००, औरंगाबादमधील २ लाख २८ हजार ४१, जालन्यातील २ लाख ७४ हजार ९०५, तर बीडमधील ३ लाख ४४ हजार ३३९ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड या तील जिल्ह्यात ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. वेगवेगळ्या वेळेत पेरणी झाली. ज्वारी काही ठिकाणी वाढीच्या, काही ठिकाणी निसवणीच्या, कणसे लागण्याच्या, तर काही ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे. तीनही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १५५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झालेल्या गव्हाचे पीक काही ठिकाणी वाढीच्या, फुटवे फुटणे ते कांढी काढण्याच्या अवस्थेत आहे. थंडी कमी असल्याने गव्हाची वाढ समाधानकारक झाली नसून काही ठिकाणी करप्याचाही प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

मक्याची चांगली उगवण

मक्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १६५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची उगवण चांगली झाली आहे. काही ठिकाणी वाढीच्या, तर काही ठिकाणी कणसे लागण्याच्या अवस्थेत पीक आहे. जालना जिल्ह्यात तुरे लागण्याच्या व वाढण्याच्या अवस्थेत मका पीक असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

हरभऱ्याची वाढ खुंटली

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत औरंगबाद, जालना व बीड जिल्ह्यात १७३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झालेल्या हरभऱ्याची उगवण चांगली झाली आहे. काही ठिकाणी फुले लागली असून काही ठिकाणी घाटे अवस्थेत, तर वाढी व फुले लागवण्याच्या अवस्थेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शिवाय थंडी कमी असण्याचा परिणाम हरभऱ्यावरही झाला आहे. हरभऱ्याची वाढ समाधानकारक नसल्याची स्थिती आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT