Raab bhajani works started in Igatpuri taluka
Raab bhajani works started in Igatpuri taluka 
मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यात राब भाजणीची कामे सुरू

टीम अॅग्रोवन

इगतपुरी, जि. नाशिक : सध्या लॉकडाऊन असले तरी आदिवासी, दुर्गम शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात आहे. या दिवसांत सहसा मजुरीवर जाणारा नागरिक लॉकडाऊनमुळे घरी बसला आहे. त्यातच शेतीची कामे सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी जमिनीच्या राब भाजणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. 

नागली, भात, वरई पिकांसाठी आदर लावण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, पुरेपूर दक्षता घेऊन सामाजिक अंतर पाळून शेतातील कामासाठी शेतकरी वेळ देत आहेत. 

लॉकडाउनचा परिणाम प्रामुख्याने शहरी भागात जास्त प्रमाणावर दिसून येत आहे. एकीकडे मजुरटंचाई असली, तरी शेतकरी आपापसात कामाचे नियोजन करून शेतीकामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत. ज्यांचा रोजगार शेतीवर अवलंबून आहे. त्यांना ग्रामीण भागातच थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे शेतीची तयारी होण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होत आहे.  राब भाजणी.. . 

आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र, अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. जमीन भाजली जाते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT