In quality agricultural universities The state did not get a place
In quality agricultural universities The state did not get a place 
मुख्य बातम्या

दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला स्थान मिळेना

टीम अॅग्रोवन

पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी विद्यापीठांच्या ताज्या यादीत महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाचा स्थान मिळवता आलेले नाही. तीन विद्यापीठांचा क्रम किंचित सुधारलेला असला तरी दोन विद्यापीठांची घसरगुंडी कायम आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) दर वर्षी क्रमयादी (रॅकिंग) जाहीर केली जाते. त्याकडे देशाच्या कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचे लक्ष लागून असते. या यादीतील स्थान पाहून विद्यार्थी देखील कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांची निवड करतात. क्रमयादी निश्‍चित करण्यापूर्वी प्रत्येक विद्यापीठांमधील कामकाज व सुविधांचा अभ्यास केला जातो. परिषद मुख्यालयातील कृषी शिक्षण विभागाकडून दर्जा विषयक कामकाज तपासले जाते. देशातील दर्जेदार कृषी विद्यापीठांची २०२०ची क्रमयादी जाहीर होताच राज्यातील विद्यापीठांमध्ये चलबिचल झाली कारण, पहिल्या दहा सोडाच; पहिल्या २० विद्यापीठांमध्ये देखील राज्यातील एकाही विद्यापीठाला क्रम मिळवता आलेला नाही. 

आयसीएआरकडून कर्नालमध्ये चालविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेला या यादीत पहिला क्रमांक मिळालेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयसीएआर आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेला स्थान मिळाले आहे.  आयसीएआरच्या क्रम यादीत अग्रस्थान नसणे, हा राज्यात कृषी शिक्षण व संशोधनाची स्थिती असमाधानकारक असल्याचा पुरावा पुरावाच आहे, असे काही कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विद्यापीठांमधील उच्चपदस्थ मात्र असा निष्कर्ष काढण्यास तयार नाहीत. ‘‘राहुरी विद्यापीठाने क्रमयादीत सुधारणा केली आहे. अकोला आणि दापोलीच्या क्रमवारीत देखील वरचे स्थान मिळालेले आहे. अनेक अडचणी असतानाही विद्यापीठे पुढे सरकत असल्याची ही पावती आहे,’’ असा दावा एका विद्यापीठाच्या संचालकाने केला आहे.  नागपूरमधील पशू व मत्सविद्यान विद्यापीठ २०१७ मध्ये १६ वा क्रमांक मिळवून चर्चेत आले होते. मात्र २०१९च्या यादीत या विद्यापीठाला २९ वा क्रमांक मिळाला. आणि आता तर थेट ३६ वा क्रमांक मिळालेला आहे. परभणीचे कृषी विद्यापीठ थेट ५१व्या स्थानावर गेले आहे. 

विद्यापीठांमधील जागा अनेक वर्षे रिक्त  ‘‘विद्यापीठांचा दर्जा घसरण्यास शासन आणि विद्यापीठांचा वर्षांनुवर्षे चालत असलेला भोंगळ कारभारच कारणीभूत आहे. विद्यापीठांमधील जागा अनेक वर्षे रिक्त ठेवल्या गेल्या, खासगी कृषी महाविद्यालयांच्या खिरापती वाटल्या गेल्या, मनुष्यबळ अतिरिक्त ताणाखाली ठेवले गेले. त्यामुळे कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती काढली गेली. पण तेव्हापासून या विद्यापीठांना सतत दमछाक करावी लागत आहे,’’ असे मत एका विद्यापीठाच्या ज्येष्ठ विभाग प्रमुखाने व्यक्त केले. 

असे आहे कृषी विद्यापीठांचे ताजे प्रगतिपुस्तक 

विद्यापीठाचे नाव …२०१९ मधील दर्जाक्रम..२०२० मधील दर्जाक्रम

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ (दापोली) ..५१...४२ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी)..४१...५१ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)..३८...२६ महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) ..२७...२३ महाराष्ट्र पशू व मत्सविज्ञान विद्यापीठ (नागपूर) ..२९..३६

प्रतिक्रिया विद्यापीठातील सर्व मनुष्यबळ एकत्रितपणे उत्तमरीत्या काम करीत असल्याने आम्हाला हे यश मिळाले. अध्यापन, सुविधा आणि गुणवत्ता यामुळे आम्हाला ही झेप घेता आली. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

देशपातळीवरील क्रमयादीत आमच्या विद्यापीठाने यंदा मजल मारली आहे. ही प्रगती आम्हाला समाधानकारक वाटते. विद्यापीठाला निधी भरपूर मिळालेला आहे. पुरस्कारही मिळत आहेत. राज्य सरकारची साथ मिळाल्यास पुढील वर्षी आम्ही वेगळे स्थान प्राप्त करू, असे वाटते. -डॉ. एस. डी. सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

आम्ही विविध पातळ्यांवर परिश्रम घेत आहोत. शेतकरी वर्गासाठी आमची कामगिरी उत्तम आहे, असे असूनही विद्यापीठाला वरचे स्थान मिळाले नाही. नेमक्या कोणत्या बाबींमुळे कमी गुण पडले याचे चिंतन आम्ही करू. अत्यावश्यक ठिकाणी सुधारणा घडवून आणत पुन्हा एकदा गरुडभरारी घेऊ. - डॉ. अशोक ढवण , कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT