At the purchase price of cow's milk An increase of three rupees per liter
At the purchase price of cow's milk An increase of three rupees per liter 
मुख्य बातम्या

गायीच्या दूध खरेदीदरात लिटरला तीन रुपये वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे ः महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गायीच्या दुधाच्या खरेदीदरात पुन्हा वाढ केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना होळीची गोड भेट दिली आहे. खरेदीदर आता प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढून सरसकट ३३ रुपये करण्यात आले आहेत. मात्र काही भागांमध्ये अद्यापही जुने दर देत सहा रुपयांची लूट सुरू आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. 

सहकारी व खासगी अशा ४५ दुग्ध प्रकल्पांच्या उपस्थितीत संघाची बैठक सोमवारी (ता.१४) पुण्यात झाली

अध्यक्षस्थानी गोपाळराव म्हस्के होते. “शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे वाढीव खरेदीदर मागील तारखेसह म्हणजे ११ मार्चपासून मिळतील. त्यामुळे खरेदीदर आता प्रतिलिटर ३३ रुपये मिळतील. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा योग्य मोबदला मिळायला हवा. त्यासाठी खरेदीदर प्रतिलिटर ३० रुपयांपेक्षा कमी होणार नाहीत, याची काळजी घेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला,” अशी माहिती संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली. 

पशुखाद्य महागल्याने दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा खरेदीदर देण्यासाठी १५ मार्चपासून दुधाच्या विक्रीदरात तीन रुपयांनी वाढ करावी, गायीच्या दुधाचे विक्रीदर आता ५० ऐवजी ५२ रुपये प्रतिलिटर ठेवावेत, असे निर्णय एकमताने घेण्यात आले. विक्रीदरात वाढ करताना ग्राहकावर प्रतिलिटर फक्त दोन रुपये बोजा टाकला जावा.  त्या ऐवजी विक्रेता मूल्य (डीलर प्राइज) ते ग्राहक या मधील गाळा एक रुपयांनी कमी करावा. त्यामुळे विक्रीदरात ३ रुपये वाढ करणे शक्य होईल, असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. 

चर्चेत महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख (समूहाचे नाव-राजहंस), प्रीतम शहा (गोवर्धन), संजीवराजे निंबाळकर (गोविंद), कुमार माने (सोनाई), श्रीपाद चितळे (चितळे), गोपाळराव म्हस्के (कात्रज), प्रकाश कुतवळ (ऊर्जा), धैर्यशील मोहिते (शिवामृत), आबासाहेब थोरात (एस. आर. थोरात) तसेच इतर प्रतिनिधींनी भाग घेतला. 

दरम्यान, “सध्याची दरवाढ उत्तम प्रकारची आहे. त्यामुळे यापेक्षा आणखी दरवाढ आता लगेच होण्याची शक्यता नाही. मात्र शेतकऱ्यांकडून कोणीही कमी दराने दुधाची खरेदी करू नये, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरसह सांगली, सातारा भागात अद्यापही दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर २७ रुपये असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

“दुधाला मागणी नसल्यास शेतकऱ्यांना अतिशय कमी दर दिला जातो. त्यामुळे आता मागणी वाढलेली असल्याने दरवाढदेखील लगेच दिली पाहिजे. दूध उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी राज्य शासनानेही कठोर भूमिका घ्यायला हवी,” अशी भावना खासगी दूध प्रकल्पाच्या संचालकाने ‘अॅग्रोवन’कडे बोलून दाखवली.  . 

‘लूट थांबवा; अन्यथा आंदोलन’

“दुधाचे उत्पादन सध्या पदरमोड करीत शेतकऱ्यांनी चालू ठेवले आहे. मात्र काही दुग्ध प्रकल्प नफेखोरीसाठी खरेदीदराला सरसकट प्रतिलिटर सहा रुपयांची कात्री लावत आहेत. ही लूट तत्काळ थांबली पाहिजे. राज्याचा दुग्ध व्यवसाय विकास विभागही मूग गिळून बसला आहे. शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याबाबत आदेश जारी करावेत. शासन ही लूट थांबवणार नसल्यास आम्हाला आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

SCROLL FOR NEXT