आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदी
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदी 
मुख्य बातम्या

आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदी

टीम अॅग्रोवन

धामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. परंतु, त्यानंतरही शासकीय खरेदी सुरू झाली नाही. परिणामी, आर्द्रता अधिक असल्याचे कारण देत बाजारात कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे.  शासनाने सोयाबीनला या हंगामासाठी ३७१० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मध्यप्रदेशात संततधार पावसाचा सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला अच्छे दिन येत दर चार हजाराच्या पार जाण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, बाजार समितीमध्ये सद्यःस्थितीत सोयाबीनला हमीभाव मिळणेही दुरापास्त झाल्याची स्थिती आहे. जुन्या सोयाबीनची खरेदी ३६०० ते ३८०० रुपये क्‍विंटलने होत आहे. नव्या सोयाबीनला मात्र २९०० ते ३२९० रुपये क्‍विंटलचाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. व्यापारी कमी दरात खरेदी करीत असताना नाफेडने मात्र यात अद्यापही हस्तक्षेप केला नाही. नाफेडने हमीभाव केंद्र सुरू केल्यास बाजारात तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. नाफेडच्या खरेदीकरिता आधी नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल आणण्याविषयी एस.एम.एस.व्दारे कळविण्यात येते. या साऱ्या प्रक्रियेला  बराच कालावधी लागतो. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया तरी नाफेडने आत्तापासून सुरू करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.  सोयाबीन काढणीवर मोठा खर्च सोयाबीन काढणीची मजुरी एकरी २५०० रुपये आहे. मजुरामार्फत काढणीनंतर मळणीसाठी २०० रुपये पोत्याप्रमाणे आकारणी होते. अशाप्रकारे मोठा खर्च पिकाच्या व्यवस्थापनावर होतो.           

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT