Purchase of 28,000 quintals of gram in Parbhani, Hingoli
Purchase of 28,000 quintals of gram in Parbhani, Hingoli 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोलीत २८ हजार क्विंटल हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ यांच्यातर्फे १३ केंद्रांवर २ हजार १०९ शेतकऱ्यांचा २८ हजार ६८० क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. तर या दोन जिल्ह्यांतील १४ खरेदी केंद्रावर ११ हजार ७१२ शेतकऱ्यांची ९७ हजार ६२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, जिंतूर, बोरी, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या ७ केंद्रांवर हमीभावाने हरभरा विक्रीसाठी ८ हजार ९८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी परभणी, बोरी, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ५ केंद्रांवर शुक्रवार (ता. २२) पर्यंत ५९० शेतकऱ्यांचा ७ हजार ३५७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्य सहकारी पणन महासंघातर्फे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी ८ हजार ३७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.त्यापैकी १ हजार १६० शेतकऱ्यांचा १७ हजार १४६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड या २ केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ३ हजार ७६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३५९ शेतकऱ्यांचा ४ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

९७ हजार ेक्विंटल तुरीची खरेदी परभणी जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या ६ केंद्रांवर नोंदणी केलेल्या २४ हजार २२८ पैकी ३ हजार ५७३ शेतकऱ्यांची ३० हजार ७९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रावर नोंदणी १३ हजार ९४५ पैकी ४ हजार ८२१ शेतकऱ्यांची ४१ हजार ७३३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रावर नोंदणी केलेल्या ५ हजार ३३ पैकी ३ हजार ३१८ शेतकऱ्यांची २४ हजार ५३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

परभणी-हिंगोली जिल्हा हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)  
खरेदीदार केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
राज्य सह. पणन महासंघ ११ २४५०४ १७५०
विदर्भ सह. पणन महासंघ ४१७६ ३५९
परभणी- हिंगोली जिल्हा तूर खरेदी (क्विंटलमध्ये)
खरेदीदार केंद्र संख्या खरेदी शेतकरी संख्या
राज्य सह.पणन महासंघ १२ ७२५२८ ८३९४
विदर्भ सह.पणन महासंघ २४५३४ ३३१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT