पाणी, स्वच्छतेबाबत १४० गावांमध्ये जनजागृती
पाणी, स्वच्छतेबाबत १४० गावांमध्ये जनजागृती 
मुख्य बातम्या

पाणी, स्वच्छतेबाबत १४० गावांमध्ये जनजागृती

टीम अॅग्रोवन

नांदेड ः  राज्‍य शासनाच्‍या पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या वतीने जलस्‍वराज्‍य टप्‍पा दोनअंतर्गत जिल्‍ह्यातील गावात प्रबोधन करण्‍यासाठी एलईडी व्‍हॅन पाठविण्‍यात आल्‍याअसून जिल्‍ह्यातील १४० गावांमध्ये एलईडी व्हॅनव्‍दारे पाणी व स्‍वच्‍छताविषयक माहितीपट, लघू चित्रपट दाखविले जाणार आहेत. या माहिती व संवाद उपक्रमात सर्वांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

शुक्रवारी (ता. ९) जिल्‍हा परिषद प्रांगणात मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून या व्हॅनचे उद्‌घाटन करण्‍यात आले. या वेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डी. यू. इंगोले, पाणी व स्‍वच्‍छता सहाय्य संस्‍थेचे विभागीय समन्‍वयक अरुण रसाळ यांची उपस्थिती होती.

श्री. काकडे पुढे म्‍हणाले, ‘‘या मोहिमेत गावातील सर्व कुटुंब, शालेय विद्यार्थी, महिला बचतगट, गावस्‍तरावरील सर्व यंत्रणेला यात सहभागी करून घ्‍यावे. या वेळी जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे लेखाधिकारी एल. ए. हिरवे, अधीक्षक अल्‍केश शिरशेटवाड, मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम, नंदलाल लोकडे आदींची उपस्थिती होती.

नांदेड तालुक्‍यातील १२ गावांतून तर बिलोली मधील ११, भोकरमधील ९, मुदखेड- १०, हिमायतनगर मधील ९, अर्धापूर मधील १०, माहूर मधील ९, उमरी मधील ९, धर्माबाद मधील ९, मुखेड मधील ९, हदगाव मधील १०, कंधार मधील ९, किनवट मधील ११, लोहा मधील १०, देगलूर मधील १०, नायगाव तालुक्‍यातील १० गावांचा समावेश आहे. 

या एलईडी व्‍हॅनव्‍दारे शौचालय बांधकाम तंत्र, गावातील स्‍वच्‍छता, घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्‍थापन, शालेय स्‍वच्‍छता, पाणी शुद्धीकरण, शाश्‍वत स्‍वच्‍छता, मासिक पाळी व्‍यवस्‍थापन, आरोग्‍य आदी विषयांवरील माहितीपटाव्दारे जनजागृती केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT