दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘धवलक्रांती संघर्ष’ Protection of milk by law ‘White Revolution Struggle’ to give 
मुख्य बातम्या

दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘धवलक्रांती संघर्ष’

रविवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा दूध पुरवठा बंद करावा. संकलन केंद्रात दूध देऊ नका, असे आवाहन ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’चे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या दुधासाठी ४३ रुपये प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी ६२ रुपये प्रती लिटर दर जाहीर करा. त्याला कायद्याचे संरक्षण देण्यासाठी धवलक्रांती संघर्ष करण्याची गरज आहे. येत्या रविवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा दूध पुरवठा बंद करावा. संकलन केंद्रात दूध देऊ नका, असे आवाहन ‘फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’चे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.    देशमुख म्हणाले, ‘‘आपल्या परिश्रमाने दुधाचा महापूर आणून, भारताला दुग्ध उत्पादनामध्ये, गेली वीस वर्षापासून, जगामध्ये प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या हातात काय आले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे श्वेतक्रांती का नासली, हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराष्ट्रात दूध उत्पादकांची वर्षाला १४,६९१ कोटी रुपयांची लूट होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी धोरण ठरविण्याऐवजी, अतिरिक्त दुधाचा कांगावा करून, पुन्हा एकदा दूध संघांच्या घशात दुधाच्या भुकटीचे अनुदान घालण्याचा शासन विचार करीत आहे. दुधाला एफआरपी द्यावी, अशी मागणी आहे. त्यामुळे सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी, दूध संघाच्या संघटित लुटीचा निषेध करण्यासाठी, दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी शहरांचा दूध पुरवठा बंद करावा.’’  या आहेत मागण्या

  •   ताज्या खर्चावर आधारित १५ टक्के नफा धरून दुधाला एफआरपी द्या
  •   दुध भेसळ माफियांवर भरारी पथक व्हॅनसकडून तपासणी करून कडक कारवाई करा
  •   दूध उत्पादनाचा अद्ययावत खर्च काढण्यासाठी चार कृषी विद्यापीठे व एका खासगी संस्थेला निर्देश द्या
  •   दुधाची फॅट मोजणीतील लूट थांबविण्यासाठी यंत्राच्या अचूकतेच्या तपासणीसाठी निरीक्षकांची नियुक्ती करा
  •   ग्राहकांसाठी गाईच्या दुधासाठी किमान विक्री किंमत ५४ रुपये प्रती लिटर निर्धारित करा
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    APMC Chairman Resigns: राजुरा बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा

    Cotton Research Center: कापूस संशोधन संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन

    Sugarcane Bill Issues: नांदेड विभागातील कारखान्यांकडे उसाचे ६७९ कोटी थकले

    Garpit Santra Nuksan: अवकाळी-गारपीटमुळे संत्रा मोसंबीमध्ये फळगळ, शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

    Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सुरूच

    SCROLL FOR NEXT