Producers' headaches have increased in Nashik due to low milk prices
Producers' headaches have increased in Nashik due to low milk prices 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची डोकेदुखी वाढली

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार महासंघाच्या माध्यमातून भुकटी निर्मितीसाठी दूध घेत असले तरी संघनिहाय कोटे ठरवून दिले आहेत. त्यामुळे उरणारे दूध २० रुपयांच्या खाली खासगी दूध संघांना द्यावे लागतेय. सध्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दरातील घसरण झाल्याने दूध उत्पादकांसमोर ही बाब डोकेदुखी ठरत आहे.

जिल्ह्यात नियमित दूध संकलन सहकारी, खासगी दूध संघामार्फत होते आहे.त्यात सहकारी दूध संघांना दूध दिल्यानंतर दराची खात्री असते. मात्र, सहकारी संघाची कपात प्रति एसएनएफ प्रति पॉइंट १ रुपया आहे. तर खासगी दूध दर कमी असले तरी या तुलनेत कपात प्रति एसएनएफ २० पैसे प्रति पॉइंट इतकी आहे. त्यामुळे ही दर व कपातीची परिस्थिती सध्या दूध उत्पादक अनुभवत आहेत.

संघाचे दर अधिक मात्र संकलन केंद्राच्या क्षमतेनुसार कोटा ठरवून दिला. त्यामुळे अतिरिक्त दूध कमी दराने खासगी दूध संघांना नाइलाजाने द्यावे लागत आहे. सध्या प्रति लीटर पशुखाद्य मजुरीसह २० रुपयांपर्यंत जात असल्याने बरोबरी होत आहे. त्यामुळे यात काहीही फायदा नसून फक्त जनावरे सांभाळतोय अशी भावना पशुपालक व्यक्त करत आहेत.

गुजरातमधील दूध संघाचे पेमेंट वेळेवर गुजरातमधील जिल्हा दूध संघ नाशिकमध्ये संकलन करतात. त्यांचे दर २ रुपयांनी कमी आहेत. सध्या राज्यातील सहकारी दूध संघ व गुजरात मधील दूध संघाचे दर सारखेच आहेत. मात्र, गुजरात दूध संघाने कोटे ठरवून दिले असले तरी दराच्या बाबतीत वेळेवर पेमेंट मिळत आहे. तर सहकारी व खासगी दूध संघ त्याबाबतीत ३ ते ४ मस्टर मागे आहेत.

लॉकडाउन काळातील दर (प्रति लीटर)
२० जूनपर्यंत २५ रुपये
२१जून ते १० जुलै २४ रुपये
११ जुलैपासून २३ रुपये
जिल्ह्यातील सध्याचा दर (प्रति लीटर)
सहकारी दूध संघ २३ रुपये
खासगी दूध संस्था १९ रुपये
गुजरातमधील दूध संघ २३ रुपये
प्रतिलीटर कमिशनमध्ये कपात
पूर्वी मिळणारे २.५० ते ३ रुपये
सध्या मिळणारे १ ते १.५० रुपये

दूध उत्पादनावर खर्च करूनही दर मिळत नसल्याने दुधाचा धंदा अडचणींचा ठरतो आहे. त्यातच आता दूध भुकटी आयातीची चर्चा आहे. सध्या दर वाढण्यापेक्षा तो कमी होत असल्याचा फटका बसतोय. त्यामुळे दूध उत्पादन व विक्री याचे गणित बिघडले आहे. - कमलाकर दाभाडे, दूध उत्पादक, बोकटे, ता. येवला

ज्यावेळी दूध कमी होते. त्यावेळी दर ३२ रुपयांपर्यंत असताना गुणवत्तेत तडजोड करून खरेदी झाली. आता याबाबत असा न्याय का? कमीतकमी २५ रुपये प्रतिलीटर दर व्यवहार्य आहे. सरकारने हस्तक्षेप करून हमी देऊन ठरल्याप्रमाणे दर देण्यासाठी प्रयत्न करावा. - सुधीर कबाडे, संचालक, इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT