पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा
पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा 
मुख्य बातम्या

पुढील वर्षी भुकेचा प्रश्‍न बिकट; ‘डब्लूएफपी’चे अध्यक्ष बिस्ली यांचा इशारा

वृत्तसेवा

न्यूयॉर्क : यंदाच्या वर्षापेक्षा पुढील २०२१ हे वर्ष अधिक धोकादायक ठरणार असून अब्जावधी डॉलरचे साह्य झाल्याशिवाय संभाव्य आपत्तीचा आपण सामना करू शकत नाही, असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाचे (डब्लूएफपी)अध्यक्ष डेव्हीड बिस्ली यांनी दिला आहे. हा इशारा सर्व जागतिक नेत्यांपर्यंत पोहोचवता यावा, यासाठीच नोबेल समितीने जागतिक अन्न कार्यक्रमाला शांतता पुरस्कार दिला असल्याची भावना बिस्ली यांनी व्यक्त केली. ‘असोसिएटेड प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीत डेव्हीड बिस्ली म्हणाले की, आमची संघटना दररोज विविध संघर्षात, नैसर्गिक आपत्तींमध्ये काम करते. अनेक वेळा आमचे कर्मचारी लाखो भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. मात्र, अद्यापही आमचा कस लागलेला नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. हाच संदेश आम्हाला जगाला देता यावा म्हणूनच की काय नोबेल निवड समितीने शांतता पुरस्कारासाठी आमची निवड केली. गेल्या महिन्यात अमेरिकेतील निवडणुकीमुळे नोबेल पुरस्कारांच्या बातमीकडे आणि विजेत्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बिस्ली यांनी सांगितले. बिस्ली म्हणाले,‘‘आम्ही एप्रिल महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जगासमोरील अन्नाच्या कमतरतेच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. त्यावेळी जग कोरोना संसर्गाशी लढण्यात गुंतले होते. मात्र, जगासमोर भुकेचा प्रश्‍नही ‘आ’ वासून उभा असून तातडीने पाऊले न उचलल्यास संकट अनेक पटींनी वाढू शकते. आपण २०२० मधील कोरोना संकटातून सावरत आहोत कारण जागतिक नेत्यांनी पैसा ओतला. मात्र, संसर्ग पुन्हा वाढतो आहे. पुढील वर्षात पुन्हा मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध नसेल. त्यामुळे आताच योग्य हालचाली करायला हव्यात.’’ संघटनेला नोबेल पुरस्कार मिळाल्याचा फायदा उठवत आपण अनेक राष्ट्रप्रमुखांना भेटत असून त्यांना सावध करत असल्याचे बिस्ली यांनी सांगितले.

अन्न संघटनेच्या आकडेवारीनुसार

  • १३ कोटी लोक : वर्षाअखेरीपर्यंत कुपोषणाच्या उंबरठ्यावर
  • २७ कोटी लोक : पुढील वर्षाअखेरीपर्यंत कुपोषणग्रस्त
  • १५ अब्ज डॉलर : अर्थसाह्याची आवश्‍यकता
  • या देशांमध्ये परिस्थिती बिकट येमेन, दक्षिण सुदान, नायजेरिया आणि बुर्किना फासो

    या देशांमधील स्थिती गंभीर अफगाणिस्तान, कॅमेरुन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, काँगो, इथिओपिया, हैती, लेबेनॉन, माली, मोझांबिक, नायजर, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझ्युएला, झिम्बाब्वे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT