The problem of employment will be solved through machinery: Collector Mandhare
The problem of employment will be solved through machinery: Collector Mandhare 
मुख्य बातम्या

यंत्रमागाद्वारे रोजगाराचा प्रश्न सुटेल : जिल्हाधिकारी मांढरे

टीम अॅग्रोवन

मालेगाव, जि. नाशिक : ‘‘प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शहरातील शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आलेल्या ११९ प्रतिबंधित क्षेत्राचे फेरनियोजन झाले. आता केवळ ४५ क्षेत्रेच शिल्लक राहिली आहेत. या ४५ प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील यंत्रमाग लवकर सुरू करून मजूरांच्या रोजगारांचा प्रश्न देखील लवकरच निकाली लागेल’’, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला. 

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रमाग चालक, मालक व मजुर संघटनांच्या प्रमुखांसोबत नुकतेच चर्चासत्र झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत आदी उपस्थित होते. 

मांढरे म्हणाले,‘‘यंत्रमाग मालक, चालक व व्यापारी यांच्यातील समन्वयाने शहरातील रोजगार सुरळीत होवू शकतो. शासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योगांना काही अटी शर्तीनुसार परवानगी दिली आहे. दोन महिन्यांपासून थांबलेल्या व्यवहाराची साखळी सुरळीत होण्यासाठी विलंब लागेल. रोजगाराची समस्या जगाला भेडसावत आहे. परंतु, नागरिकांनी जबाबदारी यथोचित पार पाडल्यास सर्व व्यवहार सुरळीत होण्यास वेळ लागणार नाही.’’ 

डॉ. सिंग म्हणाल्या, ‘‘मागील दोन महिन्यांपासून मजूरांना काम नाही. त्यामुळे त्यांच्याहाती पैसा नाही. शासनामार्फत अन्न धान्याचा पुरवठा होत आहे. मजुरांच्या हाताला काम आणि रोजगार सुरळीत होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मालेगाव शहरात बाहेरून येणारा मजूरवर्ग नाही. त्यामुळे पावरलूम सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक मजुरांना दिलासा मिळेल. मात्र,यासाठी प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा करण्याची जबाबदारी स्विकारल्यास शहरातील व्यवहार नक्कीच सुरळीत होतील.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT