संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

वऱ्हाड खासगी डेअरींकडून दूध दरकपातीची शक्यता

टीम अॅग्रोवन

अकोला   ः उत्पादनवाढीचे कारण देत खासगी दूध डेअरींकडून दरात कपातीची शक्यता उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागली अाहे.  जळगाव जिल्ह्यातील एका डेअरीने काही दिवसांपूर्वी एक रुपयाने दूध खरेदीदर कमी केला होता. अाता पुन्हा अाठवडाभरात दर कमी करण्याची चर्चा असल्याचे उत्पादकांकडून सांगितले जात अाहे.

वऱ्हाडात दुग्ध व्यवसाय फारसा वाढलेला नाही. जो काही अाहे त्यात असंख्य अडचणी निर्माण झालेल्या अाहेत. शासकीय दूध संकलनाची सुविधा जेमतेम असल्याने सर्व भार खासगी डेअरींवर अवलंबून अाहे. सध्या अकोला येथील शासकीय केंद्रावर अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील मिळून ७७०० लिटर दूध संकलन होत अाहे. या दुधाच्या कितीतरीपट दूध खासगी डेअरींकडून संकलित केले जाते.  जळगाव जिल्ह्यातील खासगी डेअरी या भागात संकलनात अाघाडीवर अाहेत.

बुलडाणा जिल्ह्यात मदर डेअरीकडूनही दूध संकलन होत अाहे. मदर डेअरीकडून सध्या गायीच्या दूधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये लिटर असा दर दिला जात अाहे. त्यानंतर पुढील प्रत्येक पॉइंटला २० पैसे अधिक वाढत जातात. दुसऱ्या एका खासगी डेअरीने दर मात्र गेल्या काळात १ रुपयाने गायीच्या दुधाचा दर कमी केला अाहे. अाजवर २७ रुपये मिळत असलेला दर अाता २६ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. येत्या काळात हा दर अाणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत अाहे.

डेअरींकडून शासनाने जाहीर केलेल्या फॅट व एसएनएफप्रमाणे दर दिले जात अाहेत. मात्र या भागात शासकीय खरेदीला मर्यादा असल्याने दूध उत्पादकांना संपुर्णपणे खासगी डेअरींवर अवलंबून राहावे लागत अाहे. या डेअरींकडून त्यांच्या धोरणानुसार दर दिले जातात. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याची वस्तुस्थिती अाहे.

सध्या अाम्हाला मदर डेअरीकडून चांगले दर दिले जात अाहेत. गायीचे दूध फॅट ३.५ अाणि एसएनएफ ८.५ साठी २५ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यानंतर वाढणाऱ्या प्रत्येक पॉइंटसाठी २० पैशांनी दर वाढतो. अद्याप तरी दर कमी झालेले नाहीत, असे आडविहिर (जि. बुलडाणा) येथील  अमोल खर्चे यांनी सांगितले.

असे अाहेत शासनाचे दर

  •  म्हशीच्या दुधाला - फॅट ६.०, एसएनएफ ९.०- ३४.०० रुपये, 
  • फॅट ७.५, एसएनएफ ९.०- ३८.५० रुपये.
  •  गायीच्या दुधाला - फॅट ३.५, एसएनएफ ८.५- २५.०० रुपये, 
  • फॅट ५.०, एसएनएफ ८.५- २९.५० रुपये.
  •  खासगी डेअरीचा दर -२५ ते २६ रुपये प्रतिलिटर.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT