पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या  नाव नोंदणीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या नाव नोंदणीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद 
मुख्य बातम्या

पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या नावनोंदणीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २५ ऑगस्टपर्यंत गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिबिरामध्ये व सामाईक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.  जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच, या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गाव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT