बेदाणा बाजाराची ऑनलाइन पाहणी पंतप्रधान मोदी यांनी केली. या वेळी या बाजारात सहभागी व्यापारी.
बेदाणा बाजाराची ऑनलाइन पाहणी पंतप्रधान मोदी यांनी केली. या वेळी या बाजारात सहभागी व्यापारी. 
मुख्य बातम्या

सांगलीतील बेदाणा सौद्याची पंतप्रधान मोदींकडून पाहणी

टीम अॅग्रोवन

सांगली ः येथील बेदाण्याच्या ऑनलाइन सौद्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून लाइव्ह घेतली. शनिवारी (ता.१७) या सौद्यात काही क्षणांसाठी तेही सहभागी झाले. त्यामुळे व्यापारी, दलाल, खरेदीदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला.  शेतीमालाला सुलभ बाजारपेठ उपलब्ध व्हावी, योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी व्यापार (ई-नाम) हा ऑनलाइन मार्केटिंग उपक्रम सुरू केला आहे. सांगली मार्केट यार्डमधील बेदाण्याचा ई-लिलाव पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच राज्य व केंद्राचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ऑनलाइन सौद्यांसाठी बाजार समितीने सहा कॅमेरे बसविले होते. ज्याच्या माध्यमातून येथील बेदाणा दिल्लीत दिसत होता; तर येथील व्यापाऱ्यांना मागणीनुसार ऑनलाइन विक्री करता यावी, यासाठी वाय-फायची सोय करण्यात आली होती.  ऑनलाइन सौद्यांसाठी अडीच टन बेदाण्याची आवक झाली होती. १४० शेतकऱ्यांचा बेदाणा होता. दिल्लीत बोली लागली. या ऑनलाइन बोलीमधून १३५ रुपयांपासून १८६ रुपयांपर्यंत दर मिळाला.  या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, पणनचे लोखंडे, अरविंद पॉल, संचालक संतोष पाटील, तानाजी पाटील, दादासाहेब कोळेकर, वसंतराव गायकवाड, अजित बनसोडे, प्रशांत पाटील, सचिव पी. एस. पाटील, एन. एम. हुल्याळकर, बेदाणा असोसिएशनचे मनोज मालू, राजू कुंभार यांच्यासह बेदाणा व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT