हतनूर बॅकवॉटरमुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर
हतनूर बॅकवॉटरमुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर 
मुख्य बातम्या

हतनूर बॅकवॉटरमुळे नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर

टीम अॅग्रोवन

रावेर, जि. जळगाव ः तापी व पूर्णा नदीच्या पुरामुळे तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे बॅकवाटर रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील नऊ गावांमधील शिवारात घुसल्यामुळे केळी, कापूस, पेरू या पिकांचे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल गुरुवारी (ता. ८) वरिष्ठांना सादर करण्यात आला. पंचनामे आणखी सुरूच असून, अंतिम अहवाल पंचनामे १०० टक्के आटोपल्यानंतर सादर होईल. यातच सततच्या पावसामुळे पंचनाम्यात अडथळा निर्माण होत आहे.  तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे बॅक वॉटर शेती शिवारात घुसल्यामुळे विशेष करून केळी, कापूस व पेरू या पिकाचे नुकसान झाले होते. जेथे शेत जमीन संपादित झाली आहे. नुकसानीचे पंचनामे होत नव्हते. मात्र, संपादित जमिनीतील पिकांचेही बॅकवाटरने नुकसान झाले होते. संपादित न केलेल्या जमिनीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्यांना दोन दिवसांपूर्वी सुरवात झाली आहे. तालुक्‍यात ऐनपूर, विटवा, निंबोल, सांगवे, थेरोळा, निंभोरासिम, पातोंडी, खिरवड, नेहेते या नऊ गावांतील केळी, कापूस व पेरू आदी पिकांचे १९६  हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे सुमारे पाच कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी व महसूल विभागातर्फे वरिष्ठांना सादर केला. वस्तुनिष्ठ पंचनामे सुरूच असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT