Prefer soybean, sunflower oil instead of palm oil
Prefer soybean, sunflower oil instead of palm oil 
मुख्य बातम्या

पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला पसंती

टीम अॅग्रोवन

पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची नोव्हेंबरमध्ये आयात वाढली आहे. पामतेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील फरक कमी झाल्याने पामतेलाची आयात ऑक्टोबरच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली. तर सोयाबीन तेलाची आयात जवळपास दुप्पट झाली. भारताला खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. 

देशात दरवर्षी १३० ते १५० लाख टनांच्या दरम्यान खाद्यतेल आयात करावी लागते. त्यात पामतेलाचा वाटा जवळपास ६० टक्क्यांच्या दरम्यान असतो. भारतात मुख्यतः मलेशिया आणि इंडोनेशियातून पामतेलाची आयात होते. मात्र, कोरोनाच्या काळात जागतिक व्यापारात अडचणी निर्माण झाल्या. तसेच या दोन्ही देशांत पाम काढणीसाठी मजूर टंचाई, आयातीच्या वाहतुकीत झालेली वाढ आणि तेलाच्या उत्पादनात घट झाल्याने वाढलेले दर यामुळे पामतेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पामतेलाऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाला रिफायनरींनी पसंती दिली. देशात सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना आणि ब्राझिलमधून होते तर युक्रेन आणि रशियातून सूर्यफूल तेलाची आयात होते. 

किती झाली तेल आयात देशात नोव्हेंबर महिन्यात पामतेल आयात घटली आहे. ऑक्टोबर महिन्यात देशात ६.९१ लाख टन पामतेल आयात झाली होती. नोव्हेंबरमध्ये पामतेल आयातीत १० टक्क्यांनी घट होऊन ५.८५ लाख टनांवर आयात पोचली. नोव्हेंबरमध्ये पामतेलाची आयात घटली असली तरी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत सोयाबीन तेलाची आयात १.८३ लाख टनांनी घटली आहे. ऑक्टोबरमध्ये २.१७ लाख टन सोयाबीन तेलाची आयात झाली होती. तर नोव्हेंबरमध्ये ४ लाख टन सोयाबीन तेल देशात दाखल झाले. तर सूर्यफूल तेलाची आयात १.१७ लाख टनांवरून २ लाख टनांवर पोचण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते नोव्हेंबरमध्ये पामतेल आयात ६ लाख टनांपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सोयाबीन तेलाची आयात ४ लाख टनांवर स्थिरावेल. 

काय दराची स्थिती मागील वर्षी सोयाबीन तेल आयात पामतेलाच्या तुलनेत १२० डॉलर प्रतिटनाने महाग होत होती. मात्र, पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने यंदा केवळ २० डॉलर प्रतिटनाने सोयाबीन तेल महाग पडत आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात कच्चे पामतेल आयात खर्च १३९५ डॉलर प्रतिटन आला. तर सोयाबीनचा प्रतिटन आयात खर्च १४१५ डॉलर प्रतिटन आणि सूर्यफूल तेलाचा खर्च १४४५ डॉलर प्रतिटन आला. पाम तेलाच्या तुलनेत सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा आयात खर्च मोठ्या प्रमाणात जास्त नव्हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT