Precipitation rains in Khandesh
Precipitation rains in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. २५) अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने पिकांची मोठी हानी झाली. जामनेर तालुक्‍यात वादळात पत्र्याच्या छप्परावरील दगड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा, मका आदींची हानी झाली. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्रीसह धुळे तालुक्‍यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिरपूर शहरासह परिसरात  सायंकाळी तुरळक पाऊस झाला. गहू, मका काही भागात आडवा झाला. शॉर्टसर्किट झाल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. यापूर्वी १७ मार्चला सायंकाळी शहरात गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

साक्री तालुक्‍यातही पिंपळनेर, देशशिरवाडे, पावडदेव, कड्याळे, पापडीपाडा, शेवगे, बल्हाणे, चिकसे, वंजारतांडा, उंभर्टी, शेलबारी, कातरवेल परिसरात गुरुवारी (ता. २६) दुपारी साडेचारला ढगांच्या गडगडाटासह पावसाने १५ मिनिटे हजेरी लावली. यामुळे कापणीसह काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांची गव्हाचे पीक झाकण्यासाठी चांगलीच धांदल उडाली. धुळे तालुक्‍यातील लामकानीसह परिसरात काही वेळ तुरळक पाऊस झाला. शिंदखेडा शहरासह परिसरात ढगाळ वातावरण होते. 

जळगावात तुरळक पावसाच्या सरी  जळगाव शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. दुपारी चारपासून ढगाळ वातावरण होते. सुमारे अर्धा तास वादळी वारा सुरू होता. वातावरणातही अचानक कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरळक पाऊस सुरू झाला. या वादळ व पावसामुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य अचानक आलेल्या पावसामुळे ओले झाले.

जामनेर तालुक्‍यात महिला मृत्यूमुखी जामनेर तालुक्‍यात गोरनाळा (ता. जामनेर) येथे पत्र्यावरील दगड पडून बुधवारी दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली. त्यावर ठेवलेला मोठा दगड डोक्‍यावर पडल्याने सुभद्रा मनोहर शेळके (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT