संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सामूहिक शेततळ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील ३५ लाभार्थ्यांना पूर्वसंमती 

टीम अॅग्रोवन

पुणे  : वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतकरी पिकांकरिता पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सामूहिक शेततळी उभारणी करत आहेत. यंदा शेततळ्यांसाठी अनुदान मिळण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे जिल्ह्यातून २८८ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १७५ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, जमाती वर्गातील ३५ लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकरी फळबागांकडे वळला आहे. फळबागेसाठी उन्हाळ्यात शाश्वत पाण्याची सोय व्हावी म्हणून शेतकरी शेतात शेततळी उभारणी करत आहेत. त्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. ‘एनएचएम’अंतर्गत सामूहिक शेततळे तर कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजना मागील काही वर्षांपासून मोठ्या स्वरूपात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी अनुदानही उपलब्ध करून देण्यात येते. या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात शेततळी उभारण्यात आली आहेत. 

गेल्या वर्षापासून कमी पावसामुळे शेततळ्यांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून सामूहिक शेततळ्यांचा लाभ फक्त अनुसूचित जाती, जमातीतील लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. यंदा सर्वसाधारण लाभार्थ्यांचे ११२, अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांचे ४४ अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांचे १९ अर्ज आले आहेत. यापैकी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून सामूहिक शेततळ्यासाठी खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आकारमानानुसार किमान एक लाख ७५ हजार रुपये ते कमाल ३ लाख ४९ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. त्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने यासाठी आॅगस्ट महिन्यात अर्ज मागविले होते. या अर्जाची लॉटरी पद्धतीने निवड केली असून लवकरच निवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT